अशी कापा आपल्या चिमुकल्यांची नखं

अशी कापा आपल्या चिमुकल्यांची  नखं

आपल्या लहानग्यांची काळजी घेणं म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष देणं. त्यांच्या नाजुक त्वचेची तर खूपच काळजी घ्यावी लागते.त्यात त्याच्या इवल्याश्या आणि कोमल हातांची नखं कापणं म्हणजे खूपच कठीण आहे.

  • Share this:

27 नोव्हेंबर : आपल्या लहानग्यांची काळजी घेणं म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष देणं. त्यांच्या नाजुक त्वचेची तर खूपच काळजी घ्यावी लागते.त्यात त्याच्या इवल्याश्या आणि कोमल हातांची नखं कापणं म्हणजे खूपच कठीण आहे. काही वेळेस भीतीही वाटते. त्यामुळे या चिमुकल्यांची नख कापत्या वेळी या काही खास टिप्स तुमच्यासाठी -

- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जोपलेली असतानाच त्यांची नखं कापा.

- लहान मुलांसाठी बनवलेल्या खास नेलकटरचा वापर करा. ते लहान असल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही.

- नवजात बालकांच्या नखांची वाढ लवकर होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी नखं कापणं गरजेचं आहे.

- नेल फायलरच्या मदतीने नखं घासून गुळगुळीत करा आणि नखांचे कोपरे समान करण्याचा प्रयत्न करा.

नाहीतर ती विचित्र कापलेली नखं कशातही अडकून त्यांना दुखापत होऊ शकते.

- लहान मुलांची नखं इतकी हळुवार कापा की त्याने मुलांच्या त्वचेला काही त्रास होणार नाही. अगदी खोलवर नखं कापली तर त्यांची त्वचा कापली जाऊ शकते, त्यामुळे याची काळजी घ्या.

- अंगठ्याची काळजी घेताना विशेष काळजी घ्या, कारण अंगठा इतर बोटांपेक्षा जरा कठीण असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 05:15 PM IST

ताज्या बातम्या