Home /News /lifestyle /

रडा सौख्यभरे! लग्नात ‘बिदाई’च्या वेळी कसं रडावं, लग्नाळू मुलींसाठी स्पेशल कोर्स

रडा सौख्यभरे! लग्नात ‘बिदाई’च्या वेळी कसं रडावं, लग्नाळू मुलींसाठी स्पेशल कोर्स

लग्नात (Marriage) बिदाईच्या वेळी कसं रडावं, (how to cry at marriage) याचं ट्रेनिंग (Training) देणारा एक कोर्स (Course) सध्या सुरु करण्यात आला आहे.

    भोपाळ, 8 सप्टेंबर : आजकाल कुठलीही गोष्ट झटपट शिकण्यासाठी अनेक क्रॅश कोर्सेस (Crash Courses) बाजारात उपलब्ध असतात. असाच एक नवा कोर्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नात (Marriage) बिदाईच्या वेळी कसं रडावं, (how to cry at marriage) याचं ट्रेनिंग (Training) देणारा एक कोर्स (Course) सध्या सुरु करण्यात आला आहे. अनेक मुलींना लग्नात कसं रडावं, याचं टेन्शन असतं. आपल्याला रडू येईल की नाही, आलं तर नीट रडता येईल की नाही, अशा अनेक प्रश्नांचा मनात असणारा गोंधळ दूर करण्याचं काम या कोर्समध्ये करण्यात येणार आहे. अशी सुचली कल्पना भोपाळमध्ये सात दिवसांचा हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. भोपाळच्या राधिका रानी यांनी हा कोर्स सुरु केला असून त्याची कल्पना त्यांना एका लग्नातून सुचली. काही दिवसांपूर्वीच त्या एका लग्नाला गेल्या होत्या. त्या लग्नात वधुला बिदाईच्या वेळी रडायलाच येत नव्हतं. बिदाईच्या काही वेळ अगोदर तिने ही समस्या तिच्या मैत्रिणींना सांगितली. त्यावर त्यांनी एक कल्पना शोधली. अगोदर नववधूनं रडायला सुरुवात करायची आणि लगेचच मैत्रिणींनी आसवं ढाळायला सुरुवात करायची. म्हणजे मग नववधूला रडण्याचा फिल येईल आणि तिचा नीट रडता येईल. प्रत्यक्षात मात्र या नववधूनं रडायला सुरु केल्यावर अजबच प्रकार झाला. नववधू इतकी ओव्हरऍक्टिंग करू लागली की तिच्या मैत्रिणींना रडण्याऐवजी हसायलाच येऊ लागलं. ते पाहून पतीदेवही हसू लागला. हळूहळू सगळी वऱ्हाडी मंडळी रडण्याऐवजी चक्क पोट धरून हसायलाच लागली. त्यामुळे नववधूला एकदम मेल्याहून मेल्यासारखं झालं. या प्रसंगातूनच राधिका रानी यांना हा कोर्स सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. हे वाचा - कॉलेजमधील मित्रानं केला घात! गुंगीचं औषध देत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार अनेक मुलींना लग्नात रडता येत नाही. अनेकींना रडण्याची इच्छा असते, पण कसं रडावं हे कळत नाही. लग्नात सगळ्यात अवघड काम रडणं हेच असतं. या गोष्टीचं प्रशिक्षण या कोर्समधून दिलं जाणार आहे. खरोखर रडायला येत नसेल, तरी डोळ्यातून पाणी कसं काढावं, चेहऱ्यावर कसे भाव असावेत आणि किती वेळ रडावं यासारख्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Lifestyle, Marriage

    पुढील बातम्या