राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

तज्ज्ञांच्या मते, कुठलीही व्यक्ती जेव्हा रागावते तेव्हा तिच्या शरीरात एक एनर्जी तयार होते. ती दाबून ठेवली, तर हृदयावर परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळी काय करावं?

  • Share this:

08 सप्टेंबर : माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण या रागानं अनेकदा होत्याचं नव्हतं होतं. मारामाऱ्या होतात. एकूणच वातावरण तर बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो.

अशा वेळी काय करायचं? तज्ज्ञांच्या मते, कुठलीही व्यक्ती जेव्हा रागावते तेव्हा तिच्या शरीरात एक  एनर्जी तयार होते. ती दाबून ठेवली, तर हृदयावर परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळी काय करावं? तज्ज्ञ सांगतात, तुम्ही अनेक सिनेमे आठवा. त्यात राग आला तर हिराॅईन डान्स करते. हिरो पंचिंग बॅगवर आपला राग काढतो. तुम्हीही तसंच करा. त्यामुळे तुमच्या रागाला वाट मिळेल. आणि वातावरणही कलुषित होणार नाही.

राग आला, तर व्यक्त होण्याआधी दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वसनानं राग शांत होण्यास मदत होते. अनेकदा लोक रागाची घटना घडून गेल्यावर तेच तेच उगाळत बसतात. तसं करू नये. बऱ्याचदा घटना या प्रासंगिक असतात. संवादानं बऱ्याच समस्या कमी होतात.

याशिवाय रोज अर्धा तास मेडिटेशन केलं तर मन शांत राहतं. आलेला राग चटकन नाहीसा होतो.

First published: September 8, 2017, 3:48 PM IST

ताज्या बातम्या