इतरांपेक्षा येतो सर्वात जास्त राग, तर हे ५ उपाय एकदा करून पाहाच

तुम्हालाही इतरांपेक्षा जास्त राग येत असेल तर पुढील काही टिप्सचा नक्की वापर करता येईल.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 06:46 AM IST

इतरांपेक्षा येतो सर्वात जास्त राग, तर हे ५ उपाय एकदा करून पाहाच

प्रत्येक माणसात राग, लोभ, आनंद अशा भावना असतात. काही घटनांवेळी अनेकांना राग येतो. आपआपल्यापरिने प्रत्येकजण राग व्यक्त करतही असतो. पण काहींना शुल्लक कारणांवरूनही राग येतो. याचा त्रास इतरांना जेवढा होतो त्याहून जास्त त्रास राग करणाऱ्या व्यक्तिलाच होत असतो. तुम्हालाही इतरांपेक्षा जास्त राग येत असेल तर पुढील काही टिप्सचा नक्की वापर करता येईल.

जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा सगळ्यात आधी त्या जागेवरून उठून निघून जा. शांत आणि मोकळ्या जागी जा. तिथे काही वेळ एकट्याने घालवा. यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि तुमचा राग शांत होईल. ज्यावेळी तुम्हाला राग येईल तेव्हा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेताना मनाला सतत सांगा की तुम्हाला राग आणि चिडचिड करायची नसून तुम्हाला शांत रहायचं आहे.

जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा सगळ्यात आधी त्या जागेवरून उठून निघून जा. शांत आणि मोकळ्या जागी जा. तिथे काही वेळ एकट्याने घालवा. यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि तुमचा राग शांत होईल.
ज्यावेळी तुम्हाला राग येईल तेव्हा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेताना मनाला सतत सांगा की तुम्हाला राग आणि चिडचिड करायची नसून तुम्हाला शांत रहायचं आहे.

राग नियंत्रणात आणण्यासाठी योग आणि मेडिटेशन करण्याची आवश्यकता आहे. अशी अनेक आसनं आहेत जी राग नियंत्रणात आणण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला रिलॅक्स तर वाटतंच शिवाय रागावरही नियंत्रण मिळतं.

नकरात्मक विचार मनात आल्यामुळे माणसाचा स्वभाव चिडचिडा होतो. यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी विचार बदलण्याची फार आवश्यकता आहे. मनात जास्तीत जास्त सकारात्मक विचार येतील अशीच भावना ठेवा. अशा लोकांना भेटा जे स्वतः सकारात्मक आहेत.

राग आल्यानंतर दुसऱ्यांचे दोष काढण्याऐवजी स्वतःच्या चुका सुधारण्याकडे लक्ष द्या. यामुळे तुम्हाला समोरच्यावर राग येणार नाही आणि एका ठराविक वेळेनंतर तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टीवर रागावलं पाहिजे आणि कोणती गोष्ट सोडून दिली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 06:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...