मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Clean Water Tank: तुमच्या पाण्याच्या टाकीत कचरा साचलाय का? या सोप्या मार्गाने करा स्वच्छ

Clean Water Tank: तुमच्या पाण्याच्या टाकीत कचरा साचलाय का? या सोप्या मार्गाने करा स्वच्छ

Clean Water Tank: तुमच्या पाण्याच्या टाकीत कचरा साचलाय का? या सोप्या मार्गाने करा स्वच्छ

Clean Water Tank: तुमच्या पाण्याच्या टाकीत कचरा साचलाय का? या सोप्या मार्गाने करा स्वच्छ

How to clean plastic water tank: घरातील पाण्याच्या टाकीतून संपूर्ण घराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही टाकी दीर्घकाळ स्वच्छ न केल्यास त्यात घाण आणि किडेही होऊ शकतात.

  मुंबई, 10 ऑगस्ट:: जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी जवळ असणं, अत्यंत आवश्यक आहे. जगण्यासाठी जसं अन्न आवश्यक असतं, तसंच पाण्याचीही गरज असता. एका दिवसात एका व्यक्तीनं किमान 7 ते 8 लिटर पाणी प्यावं. बरेच लोक तसं करतातही, पण फक्त पाणी पिणं पुरेसं नाही. तुम्ही जे पाणी पित आहात ते स्वच्छ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.  वास्तविक, घरातील पाण्याच्या टाकीतून संपूर्ण घराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही टाकी दीर्घकाळ स्वच्छ न केल्यास त्यात घाण आणि किडेही होऊ शकतात. पण एवढी मोठी टाकी कशी स्वच्छ करायची हेच लोकांना समजत नसल्याचं दिसून येतं. चला तर मग जाणून घेऊया घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काही सोपे उपाय (How to clean plastic water tank) . तुम्ही पुढील मार्गांनी घराची टाकी स्वच्छ करू शकता-
  • जर तुम्हाला तुमची पाण्याची टाकी स्वच्छ हवी असेल तर तुम्ही यासाठी तुरटी वापरू शकता. तुरटीमुळं पाण्याच्या वरच्या बाजूला साचलेली घाण स्थिर होते आणि मग ती साफ करणं सोपं होतं. त्याचबरोबर अनेक दिवस टाकीची साफसफाई न केल्यास त्यामध्ये मातीचा थर साचल्याचंही दिसून येते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा थर दूर करणं आवश्यक आहे. म्हणून, आपण तो तुरटीने स्वच्छ करू शकता, ज्यामुळं मातीचा गोठलेला थर सहजपणे काढता येतो.
  India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही
  • टाकी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुरटी आणि पाण्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी प्रथम तुरटीमध्ये पाणी मिसळून द्रावण तयार करावे लागेल. नंतर ते पाण्याच्या टाकीत टाका आणि काही वेळ थांबा. यामुळे मातीचा थर निघून जातो. अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही टाकी स्वच्छ करता तेव्हा तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि टाकी सहज स्वच्छ होईल. तथापि, नंतर टाकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
  • केमिकल किंवा इतर गोष्टींशिवाय टाकी स्वच्छ करायची असल्यास तुम्ही त्यासाठी घरातील एखाद्या मुलाची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही मुलाच्या मदतीने टाकी साफ करू शकता. प्रथम पाणी बाहेर काढा आणि नंतर ती स्वच्छ करा. मुलाच्या जागी मोठी व्यक्ती टाकीमध्ये उतरून सफाई करायला अडचण येऊ शकते.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Water

  पुढील बातम्या