मुंबई, 18 जानेवारी : रोजच्या वापरातली, पण अतिशय दुर्लक्षित अशी वस्तू म्हणजे तुमची पाण्याची बाटली. तुम्ही ती जिमला सोबत घेऊन जाता, कुठे फिरायला जाताना सोबत ठेवता. तुमची ही साथी तुमच्यासाठी कडक उन्हात कित्येक तास पाणी थंड ठेवते; पण तुम्ही हिची योग्य ती काळजी घेता का?
(How to clean water bottle) खरं तर या पाण्याच्या बाटलीत विविध जंतू, बॅक्टेरिया जाऊन बसत असतात. त्यामुळे ती वेळोवेळी स्वच्छ केली पाहिजे. कारण अस्वच्छ बाटलीतून प्यायलेलं पाणी अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतं. खासकरून सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता तर आपल्याला स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
एकच बाटली पुन्हा पुन्हा वापरली, तर जंतू वाढण्याची शक्यता असते. कारण बुरशी ही बंद आणि अंधाऱ्या जागांमध्ये जास्त वेगाने घर करू लागते. अस्वच्छ बाटल्यांमध्ये बॅक्टेरीया घर करून बसतात. अशा बाटलीतून पाणी प्यायल्याने अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. त्यामुळे रोज बाटली स्वच्छ करणं आवश्यक आहे.
हे वाचा - तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? मग सेलेब्रिटी शेफ काय सांगतात एकदा पाहाच
द मिरर या नियतकालिकाच्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञ लेस्ली रीचर्ट (Leslie Reichert) यांनी सांगितलं, बाटलीतल्या पाण्याला थोडा वेगळा वास येत असेल किंवा बाटलीतल्या पाण्याला ताजी चव लागत नसेल, तर वेळीच लक्षात घेऊन बाटली वारंवार धुण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे.
आता ही पाण्याची बाटली इतर भांड्यांसारखी तर साफ करता येत नाही. लेस्ली रीचर्ट यांनी पाण्याची बाटली धुवायचा एक योग्य मार्ग सांगितला आहे. तो वापरल्यास हानिकारक जंतूंपासून तुम्हाला धोका राहणार नाही.
हे वाचा - Dust : घरात येणाऱ्या धूळ-मातीनं त्रस्त झालाय? या वनस्पती कुठल्या कुठे घालवतील
बाटली साफ करायचा एक मोठा ब्रश असतो, त्याच्या साह्याने तुम्ही बाटली आतून साफ करू शकता. एखाद्या छोट्या ब्रशच्या साह्याने बाटलीचं झाकण साफ करू शकता. याशिवाय तुम्ही फिजी क्लिनिंग टॅब्लेट्सही वापरू शकता. या टॅब्लेट्स आणि बाटली पाण्यात घालून रात्रभर ठेवा. त्याच्या वापराने बॅक्टेरिया नष्ट होतील. बाटली धुतल्यानंतर ती नीट, स्वच्छ कापडाने कोरडी होईपर्यंत पुसून काढणंदेखील आवश्यक आहे. कारण ओल्या जागेमध्ये जंतू वाढण्याची शक्यता जास्त असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.