Home /News /lifestyle /

काही केल्या वॉश बेसिनचे डाग जात नाहीत? या टिप्स वापरून बघा, मिनिटात होईल काम तमाम

काही केल्या वॉश बेसिनचे डाग जात नाहीत? या टिप्स वापरून बघा, मिनिटात होईल काम तमाम

रोज साफसफाई न केल्यामुळे त्यावर काळे गर्द डाग पडतात आणि ते सहजासहजी जात नाहीत. बेसिनवर साचलेल्या घाणीमुळे संसर्ग होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. यासाठी बेसिनची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. याबाबत काही उपाय जाणून घेऊयात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 मे : वॉश बेसिन ही घरातील अशी एक वस्तू आहे, जी आपण दररोज अनेक वेळा वापरतो. यामुळे ती साहजिकच घाणही होते. रोज साफसफाई न केल्यामुळे त्यावर काळे गर्द डाग पडतात आणि ते सहजासहजी जात नाहीत. त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते साफ होत नाहीत आणि काळे डाग कुठेतरी राहतात. बेसिनवर साचलेल्या घाणीमुळे संसर्ग होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. यासाठी बेसिनची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मात्र, सिंक नेहमी स्वच्छ ठेवणं तेवढं सोपं काम पण नाही. याबाबत काही उपाय जाणून घेऊयात, ज्याच्या मदतीने तुम्ही जास्त मेहनत न करता तुमचे वॉश बेसिन काही मिनिटांत (Wash Basin Cleaning Tips) चमकवू शकता. बेकिंग सोडा वापरा - घराच्या वॉश बेसिनमध्ये डाग दिसत असतील तर डाग असलेल्या जागेवर बेकिंग सोडा शिंपडा आणि त्यावर थोडे व्हिनेगर टाका. 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर ब्रशने घासून घ्या. आता बेसिन पाण्याच्या मदतीने धुवा आणि मऊ कापडाने पुसून टाका. हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा बेकिंग सोडा आणि लिंबू - जर तुमचे वॉश बेसिन स्टीलचे असेल तर त्यावर गंज इत्यादीचे डाग असू शकतात. ते साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबू वापरू शकता. सर्व प्रथम या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात घ्या आणि एक जाड/घट्ट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट डाग झालेल्या भागावर लावा. 10 मिनिटे डाग असलेल्या भागावर ठेवल्यानंतर, ती ओल्या कापडाने पुसून टाका. हे वाचा - मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर - तुमच्या वॉश बेसिनला दुर्गंधी येत असेल तर, यासाठी तुम्ही घरी असलेला बेकिंग सोडा वापरू शकता. एका भांड्यात एक कप बेकिंग सोडा घ्या आणि त्यात 2 कप व्हिनेगर घाला. आता बेसिनचा नाला बंद करून बेसिनमध्ये टाका. असे केल्याने बुडबुडे तयार होऊ लागतात. काही वेळाने कोमट पाणी आणि ब्रशच्या मदतीने घासून बेसिन धुवा. यामुळे वॉश बेसिनमधून वास नाहीसा होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या