मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Wash Basin Cleaning: वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू नका जास्त खर्च, अगदी स्वस्तात होईल चकाचक

Wash Basin Cleaning: वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू नका जास्त खर्च, अगदी स्वस्तात होईल चकाचक

Wash Basin Cleaning: वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू नका जास्त खर्च, अगदी स्वस्तात होईल चकाचक

Wash Basin Cleaning: वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू नका जास्त खर्च, अगदी स्वस्तात होईल चकाचक

Wash Basin Cleaning Trick: बेसिन साफ करणं हे खर्चिक आणि वेळ खाणारं काम आहे. तुम्हाला कमी खर्चात आणि कमी मेहनतीत स्वतःच बेसिन साफ करायचं असेल, तर त्यासाठी एका ट्रिकची माहिती घेऊया.

    मुंबई, 14 ऑगस्ट : बहुतांश जणांच्या घरी पांढरं किंवा तशाच फिकट रंगाचं वॉश बेसिन असतं. तुमच्या घरीदेखील असंच बेसिन असेल, तर ते स्वच्छ ठेवण्यासाठी (Wash Basin Cleaning Tips) किती मेहनत लागते, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. कित्येक जण ओळखीच्या सफाईवाल्याला बोलवून किंवा मग एखाद्या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी बोलवून बेसिन साफ करून घेतात. हे प्रकार भरपूर खर्चिक आणि वेळ खाणारे आहेत. तुम्हाला कमी खर्चात आणि कमी मेहनतीत स्वतःच बेसिन साफ (Wash Basin Cleaning Trick) करायचं असेल, तर त्यासाठी एका ट्रिकची माहिती घेऊया. साहित्य- या ट्रिकसाठी तुम्हाला अगदी घरगुती गोष्टींची गरज भासणार आहे. तुम्हाला कोणतंही महागडं डिटर्जंट आणावं लागणार नाही. केवळ बेकिंग सोडा (Baking Soda) आणि व्हिनेगार (Vinegar) या गोष्टींच्या मदतीने तुम्ही बेसिन चकाचक (Clean Basin with help of Baking Soda) करू शकणार आहात. अशा प्रकारे करा स्वच्छ- बेसिन स्वच्छ करण्यासाठीची ही प्रकिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला विशेष मेहनत करण्याची गरज भासणार नाही. सर्वांत आधी तुम्हाला दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा संपूर्ण बेसिनवर पसरायचा आहे. बेसिनच्या पाइपमध्येही (Clean Basin Pipe with Baking Soda) एक चमचा बेकिंग सोडा टाकू शकता. त्यानंतर अर्धा ग्लास व्हिनेगार बेसिनमध्ये टाकून ठेवा. एक ते दोन तासांसाठी हे तसंच राहू द्या. त्यानंतर एका स्क्रबरच्या मदतीने बेसीन घासून काढा. तुम्हाला डिटर्जंटनेही मिळणार नाही अशी चमक बेसिनवर दिसेल. हेही वाचा- केसगळतीची समस्या होईल बंद, फक्त रुटीनमध्ये सामील करा हे 4 आयुर्वेदिक उपाय पर्यायी ट्रिक- तुमच्याकडे खाण्याचा सोडा किंवा व्हिनेगार उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी दुसरे पर्यायी पदार्थदेखील वापरू शकता. खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इनो (Eno to clean Wash Basin) वापरू शकता, तर व्हिनेगारच्या जागी कोल्ड्रिंकचा वापर करू शकता; मात्र एका गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे कोल्ड्रिंक पांढऱ्या रंगाचं किंवा पारदर्शक असावं. कोकाकोला किंवा थम्स-अपसारख्या काळ्या कोल्ड्रिंकने बेसिनवर आणखी डाग पडतील. ब्लॉक झालेला पाइपही होतो साफ- या ट्रिकची विशेष बाब म्हणजे, या पद्धतीने बेसिन स्वच्छ केल्यास केवळ वरचा भागच नाही, तर पाइपदेखील स्वच्छ होतो. तसंच, बेसिनच्या पाइपमध्ये ब्लॉकेज (Clean Blocked basin) असल्यास तेदेखील क्लिअर होते. सोबतच, बेसिनमधून दुर्गंधी येत असेल तर तीदेखील या ट्रिकमुळे नाहीशी होते. अशा प्रकारे तुम्हाला या घरगुती उपायामुळे अनेक फायदे मिळतात. तेव्हा आता तुम्हीदेखील अगदी कमी खर्चात आपलं वॉश बेसिन स्वतःच स्वच्छ करू शकता.
    First published:

    Tags: Lifestyle, Tips

    पुढील बातम्या