मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरबसल्या अगदी सहज करू शकता डोळ्यांची प्राथमिक तपासणी; जाणून घ्या सोपी पद्धत

घरबसल्या अगदी सहज करू शकता डोळ्यांची प्राथमिक तपासणी; जाणून घ्या सोपी पद्धत

जर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी घरच्याघरी डोळ्यांची प्राथमिक तपासणी करायची असेल तर शार्प साईट आय हॉस्पिटल्सचे को-फाउंडर आणि मेडिकल डिरेक्टर डॉ. समीर सूद (Dr. Sameer Sood) यांनी एक सोपी पद्धत सांगितली आहे.

नवी दिल्ली 01 एप्रिल : डोळा (Eye) हा मानवी शरीरातील (Human Body) एक महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्यांच्या मदतीनं आपण समोरील दृश्यं (Visuals) पाहू शकतो. आपल्या आसपास नेमकं काय सुरू आहे? हे समजण्यासाठी सर्वात जास्त मदत डोळ्यांची होते. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमध्ये आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे (Eye Health) दुर्लक्ष होत आहे. डिजिटल युगामुळे आपला सरासरी स्क्रीन टाईम (Screen Time) खूप वाढला आहे. म्हणजेच दिवसभरात आपण विविध कारणांसाठी स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवत आहोत. ही बाब आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरत आहे.

अनेकांना डोळ्यांशी संबंधित विविध समस्या जाणवू लागल्या आहेत. काहींच्या डोळ्यांतून पाणी येतं तर काहींना दृष्टी कमकुवत झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला असा त्रास जाणवत असेल तर तुम्ही घरच्या घरी डोळ्यांची प्राथमिक तपासणी (Primary Eye Check Up) करू शकता. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भारतीयांमध्ये वाढतंय लठ्ठपणाचं प्रमाण; 53 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका, हे शहर अव्वल

नेत्रतज्ज्ञ (Ophthalmologist) सामान्यपणे डोळे तपासणीसाठी सहा बाय सहा नियमाचा वापर करतात. या नियमानुसार, तुम्हाला20फूट अंतरावर असलेल्या एका बोर्डच्यासमोर बसवलं जातं. त्या बोर्डवर मोठ्या आकारातील अक्षरांपासून लहान आकारापर्यंत,अशा क्रमात सहा ओळी लिहिलेल्या असतात. जर तुम्ही सहा मीटर अंतरावरून सर्वांत लहान आकाराची अक्षरं असलेली ओळ व्यवस्थित वाचलीत तर तुमची दृष्टी (Vision)एकदम चांगली असल्याचं मानलं जातं. जर,तुम्हाला सर्वांत लहान अक्षरं वाचता आली नाहीत तर त्यावरील आणखी पाचवी आणि चौथी ओळ वाचण्यास सांगितली जाते. अशा प्रकारे तपासणी करून तुमच्या दृष्टीचा अंदाज लावला जातो.

दूध प्यायल्याने शरीरात Bad Cholesterol Level वाढत राहते का? जाणून घ्या त्याविषयी

जर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी घरच्याघरी डोळ्यांची प्राथमिक तपासणी करायची असेल तर शार्प साईट आय हॉस्पिटल्सचे को-फाउंडर आणि मेडिकल डिरेक्टर डॉ. समीर सूद (Dr. Sameer Sood) यांनी एक सोपी पद्धत सांगितली आहे. सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 10 फूट अंतरावरून टीव्ही (TV) बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच सामान्य आकाराच्या खोलीतील एक कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात बघा. जर न्यूज चॅनेलच्या खालील बाजूला चालणारी बातम्यांची पट्टी (टीकर हेडलाईन) तुम्ही व्यवस्थित वाचू शकला तर तुमचे डोळे एकदम निरोगी आहेत. साधारण 10 फूट अंतरावरील वस्तू एकदम स्पष्ट दिसली तर डोळ्यांना काहीही अडचण नसल्याचं मानलं जातं.

घरी डोळ्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर 10 फूट अंतरावरील वस्तू जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर ताबडतोब नेत्रतज्ज्ञांची भेट घेतली पाहिजे, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Eyes damage, Health Tips