तु्म्ही खरेदी केलेलं GOLD असली की नकली? घरच्या घरी या पद्धतीने करा सोन्याची पारख

तु्म्ही खरेदी केलेलं GOLD असली की नकली? घरच्या घरी या पद्धतीने करा सोन्याची पारख

स्वस्त दर (GOLD PRICE) म्हणून नकली सोनं (GOLD) आपण खरेदी करत तर नाही ना याकडे ग्राहकांनी लक्ष दिलं पाहिजे.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : गुंतवणूक, तातडीनं कर्ज घेणं असो किंवा विवाहासारखे समारंभ सोन्याला (Gold) अनन्य साधारण असं महत्त्व दिलं जातं. अडचणीचा प्रसंग असो किंवा आनंदाचे क्षण सोन्याची झळाळी नेहमीच दिलासा देते. त्यामुळे सोनं खरेदीकडे (Gold rate) आणि सोन्यात गुंतवणूक (Gold investment) करण्याकडे अनेकांचा कल असतो. सध्या सोनं स्वस्त (Gold price) झालं आहे, त्यामुळे लोक जास्तीत जास्त सोनं घेत आहेत. पण याच काळात ग्राहकांची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टमधील सोन्याच्या उच्चांक दराशी तुलना करता आतापर्यंत सोने 11207 रुपयांनी स्वस्त झालं आहे. लवकरच लग्नाचे सिझन सुरू होत आहे. त्यामुळे सोने बाजाराला झळाळी मिळणार हे निश्चित. सोन्याच्या किमती कमी झाल्यानं लोकांचा कल सोने खरेदीकडं वाढतो आहे. परंतु याच कालावधीत खऱ्या अर्थानं काळजी घेणं आवश्यक आहे. स्वस्त दर म्हणून नकली सोनं आपण खरेदी करत तर नाही ना याकडे ग्राहकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे जर सोने खरेदीचा विचार करत असाल तर भेसळ असलेलं खोटं सोनं ओळखण्याच्या या 5 पद्धती विषयी सर्वप्रथम जाणून घ्या.

किचनमध्ये करू शकता सोनं परीक्षण

जर तुमच्या किचनमध्ये व्हिनेगर (Vinegar) असेल तर त्याचे काही थेंब तुम्ही सोन्याच्या दागिन्यांवर टाकावेत. जर तुमचे दागिने शुद्ध सोन्याचे असतील तर त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पण जर सोनं नकली असेल तर जिथे व्हिनेगर थेंब पडलेले असतील त्या भागाचा रंग बदललेला दिसेल.

चुंबकचा वापर करू करू शकता सोनं परीक्षण

जर तुम्ही खरेदी केलेलं सोनं चुंबकाकडे आकर्षित होत असेल तर ते नकली आहे असं समजावं. जर दागिन्यांवर चुंबकाचा कोणताही परिणाम झाला नाही तर ते सोनं परीक्षणापूर्वीच पास झाले असं समजावं. जर दागिने गंजल्यासारखे दिसत असतील तर ते नकली आहेत असे समजावे, असे दागिने चुंबकाकडे आकर्षित होतात.

एक बादली पाणीदेखील सांगेल सोन्याची शुद्धता

एका बादलीत थोडं पाणी घ्या. त्यानंतर सोन्याचे दागिने त्यात टाका. जर हे दागिने त्यात बुडाले तर फ्लोटिंग टेस्टमध्ये ते पास झाले. पण जर ते दागिने पाण्यावर तरंगत राहिले तर समजावे की दुकानदाराने तुम्हाला नकली दागिने विकले आहेत.

अॅसिड टेस्ट

शुद्ध सोन्यावर नायट्रिक अॅसिडचा (Nitric Acid) कोणताही परिणाम होत नाही. परंतु, सोन्यात जर तांबे, जस्त, स्टरलिंग सिल्वर किंवा अन्य धातूंची भेसळ असेल तर नायट्रिक अॅसिड परिणाम झालेला दिसेल. या पद्धतीने तपासणी करण्यासाठी दागिने थोडेसे स्क्रॅच करा त्यावर नायट्रिक असिड टाका. जर तुमचे दागिने शुद्ध सोन्याचे असतील तर त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

हॉलमार्क जरूर तपासावा

सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्क (Hallmark) जरूर तपासावा. हॉलमार्क सर्टिफिकेशनमुळे तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेची माहिती मिळेल. हे सर्टिफिकेशन ब्युरो आॅफ इंडियन स्टँडर्डकडून दिले जाते. अनेकदा काही ज्वेलर्स हॉलमार्कविनाच दागिने विक्री करतात. त्यामुळे असे दागिने खरे आहेत की खोटे याची तपासणी ग्राहकांनी स्व:ताच करावी.

First published: April 5, 2021, 10:28 PM IST

ताज्या बातम्या