हृदयाचे आजार असलेल्या वृद्धांची लॉकडाऊनमध्ये कशी घ्यावी काळजी?

हृदयाचे आजार असलेल्या वृद्धांची लॉकडाऊनमध्ये कशी घ्यावी काळजी?

सध्याची परिस्थिती वृद्ध व्यक्ती विशेषत: ज्यांना हृदयाची समस्या आहे, त्यांच्यासाठी जास्त आव्हानत्मक आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : वयस्कर व्यक्ती तसंच उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह आणि हृदयविषयक आजार, विशेषत: हार्ट फेल्‍युअर असल्‍यास कोविड-19 संसर्ग होण्‍याचा धोका जास्त आहे. इतर आजारांच्‍या तुलनेत कोरोना झालेल्‍या हार्ट फेल्‍युअर रुग्‍णांमध्‍ये मृत्‍यूचं प्रमाण 15.3 टक्‍के इतके जास्त होते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती विशेषत: हार्ट फेल्युअरची समस्या असलेल्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्यावर कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीचा आणि लॉकडाऊनचा परिणाम जास्त होतो आहे.

मुंबईतील कृष्‍णा कार्डियाक केअर सेंटरमधील कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. अशोक पंजाबी म्‍हणाले, ''वाढवण्‍यात येणाऱ्या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर झाला आहे. एकटे राहणारे किंवा फक्‍त त्‍यांच्‍या जोडीदारासोबत राहणारे, तसेच हार्ट फेल्‍युअरसह हृदयाच्या आजारांनी पीडित वृद्ध व्‍यक्‍ती सर्वात असुरक्षित असून त्‍यांना चिंता आणि तणाव असण्‍याचा धोका आहे. म्‍हणूनच या लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान अशा विविध कारणांमुळे हार्ट फेल्‍युअर रुग्‍णांच्‍या अस्थिरतेमध्‍ये निश्चितच वाढ झाली आहे"

हे वाचा -

सध्‍याच्‍या कठीण काळादरम्‍यान अशा वृद्धांची कुटुंबातील सदस्यांनी किंवा केअरगिअर्सनी कशी काळजी घ्यावी?

1) त्‍यांच्‍यासोबत बोला - आयसोलेशनचा हा कालावधी हार्ट फेल्युअर रुग्‍णांसाठी अत्‍यंत आव्‍हानात्‍मक ठरू शकतो. यामुळे चिंता आणि तणावामध्‍ये वाढ होऊ शकते. केअरगिव्‍हर्सना दिवसातून दोनदा किंवा तीनदा कॉल्‍स किंवा व्हिडिओ कॉल्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या संपर्कात राहण्‍याचा सल्‍ला देण्‍यात येत आहे. तुम्‍ही त्‍यांच्‍यासोबत राहत असाल तर त्‍यांना बोर्ड गेम्‍स, त्‍यांना त्‍यांच्‍या आवडीची गाणी ऐकवणे किंवा एकत्र चित्रपट पाहणे अशा काही कृतींमध्‍ये सामील व्हा. त्‍यांना खात्री द्या की, हा काळ देखील निघून जाईल.

2) लक्षणे आणि औषधांसंदर्भात दक्षता घ्‍या - हार्ट फेल्युअर रुग्‍णांनी फोन किंवा व्हिडिओ कॉल्‍सच्‍या (टेलीमेडिसीन) माध्‍यमातून त्‍यांच्‍या कार्डियोलॉजिस्‍टच्‍या संपर्कात राहणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. केअरगिव्‍हर्सनी दररोज दिसण्‍यात येणाऱ्या लक्षणांची नोंद करण्‍याची आणि डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याशिवाय औषधांच्या डोसमध्‍ये कोणताही बदल न करण्‍याची काळजी घ्‍यावी.

हे वाचा - 6 फुटापर्यंतचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही! अभ्यासातून आली महत्त्वपूर्ण माहिती

3) रोजच्‍या नित्‍यक्रमासाठी एक यंत्रणा तयार करा -केअरगिव्‍हर्स रोजच्‍या घरगुती कामांसाठी एक यंत्रणा तयार करण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. जसे ऑनलाइन ग्रोसरी अॅप त्‍यांच्‍या घरांपर्यंत सामान वितरित करू शकते. तरुण सदस्‍य रोजच्‍या नित्‍यक्रमामध्‍ये साह्य करू शकतात. तुम्‍ही तुमच्‍या वृद्ध पालकांसोबत राहत नसाल तर शेजाऱ्यांच्‍या मदतीने दररोज किमान एकदा त्‍यांची विचारपूस करण्‍याचा प्रयत्‍न करा. हार्ट फेल्युअर रुग्‍णांना स्‍वत:हून अधिक प्रयत्‍न न करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात येत आहे. ते सतत थकवा आणि श्‍वास घेण्‍यास त्रास होणे अशा लक्षणांचा सामना करत आहेत.

4) इमर्जन्‍सी क्रमांक उपयुक्‍त ठरू शकतात - हार्ट फेल्युअर रुग्‍णांना वारंवार हॉस्पिटलमध्‍ये भरती व्‍हावे लागते. म्‍हणून आपत्तीजनक स्थितीमध्‍ये जवळचे हॉस्पिटल, रुग्‍णवाहिका सेवा आणि शेजाऱ्यांची संपर्क माहिती तुमच्‍या आणि रुग्‍णांच्‍या फोनमध्‍ये असणे महत्त्वाचे आहे. हे इमर्जन्‍सी क्रमांक सहजपणे उपलब्‍ध होऊ शकतील आणि त्‍यासाठी मोबाईलमध्ये पासवर्ड नसल्‍याची खात्री करा.

हे वाचा - पुण्यात जी चूक तरुणाने केली तीच दुसऱ्या महिलेकडूनही झाली, अवघ्या 8 तासांत मृत्यू

5) त्‍यांना आरोग्‍यदायी आहार आणि हलक्‍या स्‍वरूपात व्‍यायाम करण्‍याची सवय लावा - केअरगिव्‍हर्सनी त्‍यांच्‍या वृद्ध रुग्‍णांची जीवनशैली आणि आहार देखील निश्चित करावा. विविध अॅप्‍स उपलब्‍ध आहेत. अशा अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून हार्ट फेल्युअर रुग्‍णांच्‍या आहारविषयक गरजांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. जसे मर्यादित प्रमाणात पाण्‍याच्‍या सेवनासाठी वॉटर रिमांइडर अॅप्‍स, मीठ आणि प्रथिने/ जीवनसत्त्वे सेवनाचे मापन करणारे अॅप्‍स, वृद्धांसाठी सोपे घरगुती व्‍यायाम दाखवणारे लाइट एक्‍सरसाइज अॅप्‍स. तुम्‍ही त्‍यांना प्रोत्‍साहित व साह्य करण्‍यासाठी या कृती करू शकता.

लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं