मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुंदर दिसण्यासाठी वापरताय आर्टिफिशियल आयलॅश? त्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या सूचना

सुंदर दिसण्यासाठी वापरताय आर्टिफिशियल आयलॅश? त्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या सूचना

आर्टिफिशियल आयलॅश घेतांना चांगल्या क्वॉलिटीच्या घ्याव्यात.

आर्टिफिशियल आयलॅश घेतांना चांगल्या क्वॉलिटीच्या घ्याव्यात.

काही महिलांना आर्टिफिशिअल आयलॅश (Artificial Eyelashes) वापरणं आवडतं मात्र, चांगल्या प्रतीच्या (Good Quality) आर्टिफिशियल आयलॅश खरेदी न केल्यामुळे लावताना अनेक अडचणी येतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 जून:  देखणे डोळे चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये आणखीन भर घालतात. चेहऱ्याच्या मेकअप मध्येही डोळ्यांच्या मेकअपला (Eye Makeup) जास्त महत्व आहे. डोळ्यांच्या पापण्या दाट आणि लांब असतील तर अशी व्यक्ती आणखीनच देखणी (Beautiful) वाटते. त्यामुळेच आपल्या डोळ्यांच्या पापण्या घनदाट आणि सुंदर दिसण्यासाठी अनेकजणं आर्टिफिशियल आयलॅश (Artificial Eyelashes) वापरतात. मात्र, बऱ्याच वेळा आर्टिफिशियल आयलॅश निवडताना झालेल्या चुंकामुळे सुंदर दिसण्यापेक्षा त्रासच जास्त होतो.

कोणत्या आर्टिफिशियल आयलॅश चांगल्या आहेत याची माहितीच नसल्यामुळे लावताना अनेक अडचणी येतात. कधीकधी चुकीचे आयलॅश घेतल्यामुळे त्या व्यवस्थित लावता येत नाहीत किंवा लावल्यानंतर पडतात. त्यामुळे आयलॅश खरेदी करताना टिप्स वापरा.

(हे वाचा- OMG! सोशल मीडियावर VIDEO पाहून लावला फेस मास्क; तिच्या चेहऱ्याचं काय झालं पाहा)

आर्टिफिशियल आयलॅश जड नसाव्यात

पहिल्यांदाच आर्टिफिशियल आयलॅश (Heavy Artificial Eyelashes) वापरणार असाल तर, वजनाने हलक्या असणाऱ्या खरेदी करा. जड आयलॅशमुळे डोळ्याच्या पापण्या जड वाटायला लागतात. जर, आयलॅशचं वजन जास्त असेल तर, पापण्यांवर ताण येऊन डोळे सतत बंद होत राहतात. त्यामुळे जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत वजनाने हलक्या आयलॅश वापराव्यात.

डॅमी किंवा सिंगल आयलॅश

डोळ्यांच्या आकाराप्रमाणे परफेक्ट आयलॅश (Perfect Eyelash) मिळणं थोडं कठीण असतं. त्यासाठी डॅमी किंवा क्रिस्पी आयलॅश खरेदी करू शकता. त्या आपल्या डोळ्यांच्या पापण्यांवर अगदी सहज लावता येतात. त्यामुळेच आयलॅश किट घेण्यापेक्षा अशा प्रकारच्या सिंगल आयलॅश खरेदी करू शकता. मात्र या आयलॅश लावायला थोडा जास्त वेळ लागेल. त्यामुळे बाहेर जाणार असाल तर, नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर मेकअप करायला सुरूवात करा. या आयलॅश लावत असताना थोडं अंतर सोडून लावाव्यातं. व्यवस्थित लावल्यानंतर आपल्या पापण्या घनदाट आणि सुंदर दिसतात.

(हे वाचा- रस्त्यावर तडफडत होतं झुरळ; त्याला वाचवण्यासाठी तरुणाने थेट गाठलं हॉस्पिटल)

ट्रान्सफरंट लॅशबॅन्ड

आयलॅश घेताना ट्रान्सफरंट लॅशबॅन्ड असलेल्या घ्या. मात्र, त्या लावाण्यासठी गोंद काळ्या रंगाचा वापरावा. काळ्या आयलॅशवर ट्रान्सपरंट रंगाचा गोंद लावला नाही तर आयलॅश नैसर्गिक वाटत नाहीत. त्याशिवाय त्वचा आणि लावलेल्या आयलॅश यांच्यामधला गॅप देखील सहजपणे दिसतो. त्यामुळे आपण आर्टिफिशल आयलॅश लावल्यात हे लगेच लक्षात येतं.

(हे वाचा- गर्भावस्थेत कधीच घेऊ नका ही गोळी; बाळाच्या मानसिक आरोग्यवर होईल परिणाम)

ब्रॅन्डेड आयलॅश खरेदी करा

आर्टिफिशियल आयलॅश घेतांना त्या चांगल्या क्वॉलिटीच्या आणि ब्रॅन्डेड कंपनीच्या असाव्यात. त्यामुळे त्वचा आणि आपल्या डोळ्यांच्या पापण्या यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. शिवाय सहजपण लावता येतात. मात्र लक्षात ठेवा. प्रोफेश्नल मेकअप आर्टिस्ट मेकअप करताना हलक्या प्रतीच्या आयलॅश लावतात. त्यामुळे दुसर्‍यांकडून मेकअप करून घेत असाल तर, स्वतःलाच ब्रॅन्डेड कंपनीच्या आयलॅश खरेदी करा.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle