मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship with parents: तुमचेही वारंवार आई-वडिलांसोबत वाद होतात का? संबंध सुधारण्यासाठी या आहेत 5 टिप्स

Relationship with parents: तुमचेही वारंवार आई-वडिलांसोबत वाद होतात का? संबंध सुधारण्यासाठी या आहेत 5 टिप्स

इच्छा असूनही अनेकांचे आई-वडिलांसोबतचे नातेसंबंध (Relationship with parents) चांगले राहू शकत नाहीत किंवा आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे सांगू शकत नाहीत. याची जनरेशन गॅप, भिन्न विचारसरणी अशी अनेक कारणं (How to build strong relationship with parents) असू शकतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 डिसेंबर : बहुतेक लोकांसाठी, त्यांना जन्म देणारे पालक सर्वांत महत्त्वाचे असतात. त्याच बरोबर काही लोक असेही असतात, जे त्यांची इच्छा असूनही त्यांचे त्यांच्या आई-वडिलांसोबतचे नातेसंबंध (Relationship with parents) चांगले राहू शकत नाहीत किंवा आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे सांगू शकत नाहीत. याची जनरेशन गॅप, भिन्न विचारसरणी अशी अनेक कारणं (How to build strong relationship with parents) असू शकतात. मात्र, एकमेकांना समजून घेऊन आणि काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या पालकांसोबतचं नातं अधिक घट्ट करू शकता. पालकांशी मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी टिप्स (Tips to build strong relationship with parents) संवाद साधा (कम्युनिकेशन गॅप कमी करा) अनेकदा कामात व्यग्र राहिल्यामुळं लोक आपल्या पालकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. परंतु, त्यांच्याशी असलेलं नातं घट्ट करण्यासाठी, संवादातील दरी (communication gap) कमी करणं आवश्यक आहे. म्हणूनच तुम्ही दिवसातील काही वेळ त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी काढा. काम नसतानाही कॉल करा अनेकदा मुलं काही अडचण किंवा काम असेल तेव्हाच दूर राहणाऱ्या त्यांच्या पालकांना फोन करतात, पण त्यांच्याशी नाते घट्ट करण्यासाठी, त्यांच्याशी कोणतेही काम न करता फोनवर बोला. हे वाचा - Men’s health : चांगल्या सेक्स लाईफसाठी पुरुषांनी या गोष्टी नक्की खाव्यात; आहेत अनेक फायदे त्यांचं म्हणणं ऐका कधीकधी असं होतं की, मुलं आणि पालकांची मतं जुळत नाहीत. अशा स्थितीत वाद होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, तुम्ही त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेऊन तुमचा मुद्दा प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. पालकांसोबत फिरायला किंवा सहलीला जा आई-वडिलांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत तयार करा. तसंच त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणांबद्दल विचारा. तुमच्या भविष्यातील योजनांमध्ये त्यांचा सामावून घ्या तुम्ही तुमच्या भविष्याची अनेक स्वप्नं रंगवत असाल. तुमच्या या योजना पालकांसोबत शेअर करा. त्यांनाही त्याचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करा. हे वाचा - Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत प्रेम व्यक्त करा आई-वडिलांना मिठी मारायला, आय लव्ह यू म्हणायला किंवा त्यांच्याशी निगडीत कुठलीही भावनिक गोष्ट सांगायला मुलं कचरतात, असं अनेक वेळा पाहायला मिळतं. पण कधी कधी ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्यास किंवा तुम्ही त्यांची किती काळजी घेता, त्यांच्यावर प्रेम करता हे व्यक्त करताना अजिबात संकोच करू नका. प्रेम व्यक्त केल्यानं त्यांनाही बरं वाटेल आणि तुमच्या नात्यांचे बंधही घट्ट होतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या