ऑफिसमधील त्रास देणाऱ्या सहकाऱ्यांशी असं वागा!

कधीकधी सहकाऱ्यांच्या असहकारी वृत्तीमुळे आणि चुकीच्या कामाचा तुमच्या कामावरदेखील परिणाम होतो.

  • Share this:

शांत रहा- कोणत्याही अप्रिय परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देऊ नका. नेहमीच थंड डोक्याने विचार करा. रागाच्या भरात तसेच चिडचिडीमुळे त्या व्यक्तींना आपल्यावर बोलण्याची आयती संधी मिळते. शांत राहिल्याने आपण नियंत्रित राहता आणि योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत रहा.

समोरच्याचा हेतू समजून घ्या- आपण ज्या व्यक्तींसोबत जास्त राहता किंवा त्यांच्याबरोबर काम करता त्यांचा हेतू समजून घ्या. बऱ्याचवेळा आपण समोरच्याला समजून घेतल्याशिवाय त्यांच्याबद्दल मत बनवतो किंवा एखादा निर्णय घेऊन टाकतो.

दुसऱ्यांचा हेतू समजून घ्या- आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. त्या व्यक्तीबद्दलच्या इतरांच्या व्यवहाराकडे पाहा आणि त्यांचे अनुभव ऐका. समोरच्याचे अनुभव ऐका आणि तुमचेही अनुभव त्यांना सांगा.

तुमचं मत चुकीचं समजू नये- ऑफिसच्या वातावरणात, तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लागू नये म्हणून तुमचं मत वेळीच स्पष्ट करा. ज्यामुळे गैरसमज होणार नाहीत.

चांगले संबंध तयार करा- पीसी, ईमेल आणि मेसेज हे दोन माणसांमध्ये मैत्री होण्यास पुरेसं नसतं. वैयक्तिक संवाद होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. लोकांचे छंद, आनंद आणि दु: ख तसेच त्यांच्या कुटुंबाबद्दल बोला. यामुळे सहकाऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि ते आपल्याला समजून घेण्याची ही चांगली संधी आहे.

प्रत्येकाचा आदर करा- कोणत्याही व्यक्तीचा अनादर करू नका. म्हणूनच, एखाद्या व्यक्तीबाबत तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी त्याच्याशी आदराने वागा आणि तुमची समस्या नम्रपणे त्याच्यासमोर मांडा.

कामावर लक्ष केंद्रीत करा- कधीकधी सहकाऱ्यांच्या असहकारी वृत्तीमुळे आणि चुकीच्या कामाचा तुमच्या कामावरदेखील परिणाम होतो. या सर्व समस्या जरी असल्या तरी कामाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. स्वतःचं संतुलन न गमावता प्रामाणिकपणे काम करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 09:14 PM IST

ताज्या बातम्या