Home /News /lifestyle /

Success Mantra: जीवनात निराशा कुणाला चुकलीय; यशस्वी लोकं त्यावर अशी करतात मात

Success Mantra: जीवनात निराशा कुणाला चुकलीय; यशस्वी लोकं त्यावर अशी करतात मात

Tips to become emotionally strong: बिकट स्थितीत मागे जाता येत नाही आणि पुढे जाण्याचा मार्गही समजत नाही. अनेक वेळा, वैयक्तिक जीवनात सतत समस्या किंवा संकटांना तोंड देत असताना अनेक लोक भावनिकदृष्ट्या कमकुवत होत जातात आणि..

    नवी दिल्ली, 21 जानेवारी : सहसा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तो/ती मानसिकरित्या (emotionally down) तुटते. काहीतरी गमावणे, पराभवाला सामोरे जाणे, नाते तुटणे किंवा मोठा त्रास कोणालाही निराश करू शकतो. अशा बिकट स्थितीत मागे जाता येत नाही आणि पुढे जाण्याचा मार्गही समजत नाही. अनेक वेळा, वैयक्तिक जीवनात सतत समस्या किंवा संकटांना तोंड देत असताना अनेक लोक भावनिकदृष्ट्या कमकुवत होत जातात आणि सर्व काही सोडून देणे किंवा स्वतःचे नुकसान करणे यासारखे विचार त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागतात. अशा परिस्थितीत त्या नकारात्मक विचारांशी लढणे आवश्यक आहे. यासाठी काही सोप्या टिप्सचा (How to become emotionally strong) अवलंब करता येईल. तुम्ही किंवा तुमचा कोणीतरी नातेवाईक-मित्र कठीण काळातून जात असेल, तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. जाणून घेऊया काही टिप्स ज्याद्वारे तुम्ही भावनिकदृष्ट्या कणखर होऊ शकता. भावनिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी - नवीन ध्येये बनवा नकारात्मकतेला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती परिस्थिती ओळखणे आणि स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे. प्रत्येकाची दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. काही लोक रडून तर काही रागाने व्यक्त करतात. त्याच वेळी काही लोक काळजी करू लागतात, परंतु या सगळ्यामध्ये वाईट परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला काही साध्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला जीवनात नवीन ध्येये (Set new goals) ठेवावी लागतील. ही ध्येय लहान ते मोठी काहीही असू शकतात. तुम्ही दिवसाची नवीन योजना बनवू शकता. ज्यामध्ये निरोगी नाश्ता बनवणे, नवीन रोपे घरी आणणे, नवीन पुस्तक वाचणे इत्यादींचाही समावेश असू शकतो. तुम्ही तुमची विश लिस्ट तयार करू शकता. यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या रुटीन लिस्टमध्ये काही वेगळे टास्क देखील ठेवू शकता. जसे कुत्र्यांना, गायींना खायला घालणे, मुलाला शिकवणे, पक्ष्यांना खायला घालणे इ. यातून वेगळा आनंद मिळू शकतो. नियमित व्यायाम करण्याची सवय लावा व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच, शिवाय तुमचा तणाव कमी करून तुम्हाला आनंदी बनवते. चिंता कमी करण्यासाठी व्यायाम किंवा योगासने करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज डान्स करू शकता. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. हे वाचा - कोरोनाचा जास्त त्रास झालेल्या लोकांमध्ये हे मानसिक आजार बळावण्याची भीती : नवं संशोधन तुम्हाला आनंद देणारे काम करा मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मस्त-छान वाटण्यासाठी, तुम्हाला आनंदी राहावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आनंद देणारे काम करावे लागेल. चित्रकला, लेखन, गाणे, वाचन किंवा कोणताही खेळ खेळून किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करूनही तुम्हाला बरे वाटेल. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात जुन्या वाईट सवयींपासून अंतर ठेवा आपल्यासाठी चांगल्या नसलेल्या सवयी आणि लोकांपासून अंतर राखण्यात काहीच गैर नाही. तुम्हाला तुमचे जीवन डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Mental health

    पुढील बातम्या