ऑफिसमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी करा हे उपाय, कधी होणार नाही अपयशी

ऑफिसमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी करा हे उपाय, कधी होणार नाही अपयशी

जस जसा वेळ निघून जातो, काम करण्यात शिथिलता येते. यामुळे फक्त तुमच्या कामावरचं नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो.

  • Share this:

ऑफिसमध्ये दररोज 9 तास काम केल्यानंतर अनेकजण कम्फर्ट झोनमध्ये जातात. करिअरच्या सुरुवातीला प्रत्येकामध्येच एक वेगळा उत्साह असतो. स्वतःला कामात पूर्ण झोकून दिलं जातं. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचंही कौतुक होतं. पण जस जसा वेळ निघून जातो, काम करण्यात शिथिलता येते. यामुळे फक्त तुमच्या कामावरचं नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो. पण तुमच्यातल्या या बदलाचं खापर ऑफिसमधल्या कामावर किंवा सहकाऱ्यांवर टाकू नका. याची जबाबदारी स्वतः घ्या.

मुल्यांकन करा- लोक तुमच्या कामाबद्दल काय विचार करतात याहीपेक्षा महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे तुम्ही तुमच्या कामावर समाधानी आहात का? आठवड्यात स्वतःचं मुल्यांकन करण्यासाठी अर्धा तास तरी द्या. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही जे टार्गेट स्वतःसाठी तयार केलं होतं ते पूर्ण झालं का? कोणतं काम तुम्हाला जास्त आव्हानात्मक वाटतं आणि कोणत्या कामामुळे वेळ वाया जातो याचाही विचार करा. तुमचं लक्ष अशा कामावर जास्त केंद्रीत करा जी आव्हानात्मक आहेत.

सेफ झोनमधून बाहेर पडा- प्रत्येकाचा एक सेफ झोन असतो. एकदा का तुम्ही ऑफिसमध्ये कम्फर्ट झोनमध्ये गेलात तर तुमची वाढ खुंटते. अशावेळी अशा कामांची निवड करा जी करायला तुम्ही सहसा घाबरता. उदाहरण द्यायचं झालं तर प्रेझेंटेशन द्यायला तुम्ही घाबरत असाल किंवा व्हिडीओ शूट करण्यासाठी संकोच वाटत असेल तर अशी कामं स्वतःहून करायला प्राधान्य द्या. असं केल्याने तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे परिपूर्ण करू शकता. याने तुमच्यातला आत्मविश्वासही वाढेल.

डर के आगे जीत है- एका जाहिरातीचं हे वाक्य ऑफिसमधील वातावरणासाठी अगदी योग्य आहे. अनेकदा काही अशी कामं असतात ज्याबद्दल निरर्थक भीती मनात असते. या भीतीमुळे मनात नकारात्मक भावना तयार होते, यामुळे कामाच्या गुणवत्तेवर याचा पूर्ण परिणाम होतो. स्वतःला चॅलेंज करून तुम्हाला ज्या कामाची भीती वाटते ते स्वीकारा आणि यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवा. यामुळे काम करण्यात तुमचा उत्साह वाढेल आणि भीती जाऊन आत्मविश्वासही वाढेल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

भारताशिवाय या 5 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो गोकुळाष्टमी

ऐकावं ते नवल! नवऱ्याचं अतीप्रेम झालं असह्य, पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

आतापर्यंत घालत होता चुकीचे सूर्यनमस्कार? इथे पाहा योग्य पद्धत

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 05:02 PM IST

ताज्या बातम्या