S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

थंडीत चेहऱ्याबरोबर 'अशी' घ्या आपल्या पायांची काळजी

खरंतर चेहऱ्याबरोबरच आपल्या पायांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. थंडीत पायांना भेगा पडतात. त्याने आपले पाय विचित्र दिसतात. खालील काही खास उपाय तुमच्या पायांसाठी.

Sachin Salve | Updated On: Dec 4, 2017 02:26 PM IST

थंडीत चेहऱ्याबरोबर 'अशी' घ्या आपल्या पायांची काळजी

04 डिसेंबर : थंडी आली की आपण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतो. आपले पाय सतत बुटांमध्ये लपलेले असतात म्हणून आपण आपल्या पायाची काळजी घेत नाही. पायांना पेडिक्योर करत नाही. खरंतर चेहऱ्याबरोबरच आपल्या पायांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. थंडीत पायांना भेगा पडतात. त्याने आपले पाय विचित्र दिसतात. खालील काही खास उपाय तुमच्या पायांसाठी.

पायांची अशी घ्या काळजी

- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायांना पडणाऱ्या भेगांमध्ये घाण साचू देऊ नका. त्यासाठी पाय स्वच्छ ठेवा. ऑफिसला जाताच पायांना स्वच्छ धुत जा.


- पायांच्या तळव्यांना नेहमी स्क्रब करा. त्याने पायांवरील धुळ आणि घाण निघून जाईल.

- रोज रात्री झोपण्याआधी आपल्या चेहऱ्यासारखीच आपल्या पायांचीही काळजी घ्या. पायालाही मॉइश्चरायझ करा.

- ऑलिव्ह ऑइल किंवा कोणतीही मॉइश्चराइज क्रिम लावा. त्याने पाय मऊ होतील आणि भेगाही पडणार नाहीत.

- आठवड्यातून एकदातरी पायाला स्क्रब करायला विसरु नका. स्क्रब करण्यासाठी जव किंवा तांदळाच्या पीठाचा वापर करा.

- एका मोठ्या चमच्यात तांदळाचं पीठ घ्या. त्यात मध आणि लिंबाचा रस पिळा आणि पायाला लावा. त्याने पायाला एक वेगळाच निखार येईल. पाय मऊ होतील.

- ग्लिसरीन थंड त्वचेची काळजी घेण्याचं काम करतं. त्यामुळे भेगा घालवण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो.

- ग्लिसरीन आणि गुलाबजलाचे मिश्रण करा आणि पायाला लावा. 10 मिनिटानंतर पाय धुवा. याने पाय मुलायम होतील. आणि थंडीचा पायांवर परिणाम होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close