Home /News /lifestyle /

Mutual Fund वारसदाराचं नाव बदलायचं आहे? फॉलो करा सहजसोपी प्रक्रिया

Mutual Fund वारसदाराचं नाव बदलायचं आहे? फॉलो करा सहजसोपी प्रक्रिया

  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : एखाद्याच्या मृत्युनंतर संपत्ती आणि पैसे आपल्या जवळच्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी बँकेत वारसदार म्हणूनही त्याचंच नाव ठेवलं जातं. मृत्युनंतर वारसदाराला संपत्ती मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी वारासदाराचं नाव नोंदवणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर वारसाला नाव लावून घेण्यासाठी बरेच कायदेशीर प्रयत्न करावे लागतात. अनेकदा काही जण वेळ वाचावा म्हणून म्युच्युअल फंड फॉर्मवरील वारसदार या रकान्यात कुणाचंही नाव टाकत नाही. परंतु आपल्या संपत्ती आणि बँकेतील खात्यासाठी वारासदाराची नोंद असणं खूप महत्त्वाचं आहे. वारसदार का महत्वाचा आहे? वारसदार म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीचा आणि पैशाचा मालक. तुमच्या मृत्यूनंतर योग्य व्यक्तीकडे संपत्ती जाण्यासाठी तुम्ही वारासदाराची नोंद करू शकता. तुम्हाला जिवंतपणी संपत्ती त्याच्या नावावर करायची नसून मृत्युनंतर तुमची संपत्ती तुमच्या हक्काच्या व्यक्तीकडे जाण्यासाठी वारासदाराची नोंद करणं गरजेचं आहे.

  (वाचा - आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस)

  जॉईंट अकाउंट उघडणं उपयोगी की वारसदार नोंदवणं - तुमच्या पश्चात दुसरा अकाउंट होल्डर असेल तर उत्तम, पण वारसदार म्हणून तुम्ही नोंद करू शकता. जर तुम्ही एकटेच गुंतवणूक करणार असला तर तुम्हाला वारासदाराची नोंद करणं गरजेचं आहे. वारसदार हा तुमच्या या फंडचा केवळ ट्रस्टी राहणार असून जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही दोघंही त्या खात्यावर व्यवहार करू शकता. मुख्य म्हणजे अनेकदा गुंतवणूक करताना व्यक्ती एकटाच करतो. जॉईंट अकाउंट उघडत नाही. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला नातेवाईक किंवा घरातील जवळच्या व्यक्तींच्या साह्य देण्याची गरज नसते. मृत्युनंतर तुमची संपत्ती अनाथ नसून त्याला कुणीतरी वारस आहे हे वारसदाराच्या नावावरून कळतं. तसंच वारासदाराचे केवळ नाव नोंदवणं गरजेचं आहे. त्याच्या सहीची देखील आवश्यकता नाही. कुणाचं नाव टाकू शकता? वारसदार म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या आणि विश्वासातील व्यक्तीचं नाव नोंदवू शकता. यावर तुम्हाला तीन वारासदारांची नावं नोंदवण्याची मुभा आहे. पण तुम्हाला यामध्ये कुणाच्या नावे किती संपत्ती किंवा म्युच्युअल फंड द्यायचा आहे हे देखील टाकावं लागणार आहे. तुम्ही तसं न केल्यास समान वाटा त्या तिघांनाही देण्यात येईल. लहान मुलाला वारसदार म्हणून नोंदवू शकतो? तुमच्या लहान मुलाला देखील तुम्ही वारसदार म्हणून नोंदवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला त्याचा जन्म दाखला आणि गार्डियनदेखील नोंदवावे लागणार आहेत. त्यांचा पत्ता आणि नाव नोंदवल्यानंतर तो वारसदार ग्राह्य धरला जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर गुंतवणूक करत असला, तर तुम्हाला त्याचे नाव वारसदार म्हणून नोंदवता येणार नाही.

  (वाचा - दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाई)

  मध्येच वारसदाराचे नाव बदलू शकतो? तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये हव्या तितक्या वेळा वारसदाराचं नाव बदलू शकता. यासाठी तुम्हाला केवळ फॉर्म भरून द्यायचा आहे. पण जर जॉईंट अकाउंट असेल तर तुम्हाला त्या सगळ्यांची सही घ्यावी लागणार आहे. हल्ली अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी ऑनलाईन देखील वारसदार बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  (वाचा - बँकिंग फ्रॉडपासून सावधान; 'या' गोष्टी चुकूनही करू नका)

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Savings and investments

  पुढील बातम्या