तुमचं कौतुक तुम्ही कसं स्वीकाराल?

तुमचं कौतुक तुम्ही कसं स्वीकाराल?

एखाद्यानं आपली प्रशंसा केली तर कशी प्रतिक्रिया द्यायची हे बऱ्याचदा कळत नाही. त्यामुळे चुकीचे सिग्नल्स जाऊ शकतात. अशा वेळी काय करायचं याच्या काही टीप्स

  • Share this:

28 आॅक्टोबर : कोणी आपलं कौतुक केलं तर कोणाला आवडत नाही? पण अनेकदा ते कौतुक स्वीकारणं अनेकांना जमत नाही. एखाद्यानं आपली प्रशंसा केली तर कशी प्रतिक्रिया द्यायची हे बऱ्याचदा कळत नाही. त्यामुळे चुकीचे सिग्नल्स जाऊ शकतात. अशा वेळी काय करायचं याच्या काही टीप्स

  1. कौतुक करणाऱ्या व्यक्तीसमोर तुम्ही संकोच दाखवू नका. कोणी कौतुक केलं तर चेहऱ्यावर स्मित ठेवा
  2. तुमचं काम हीच तुमची ओळख असते. म्हणून कौतुक करणाऱ्या व्यक्तीला लगेच धन्यवाद द्या
  3. कुठलंही कौतुक सहजतेनं घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. विषय बदलू नका. त्यानं तुमचं इम्प्रेशन चुकीचं पडू शकतं
  4. कौतुक करणाऱ्या व्यक्तीला आदर दाखवा. त्यावेळी दोन्ही हात घडी घालून उभे राहू नका
  5. धन्यवादासोबत अजून चांगले काम करू, तुमचं मार्गदर्शन असू द्या अशी वाक्य तुमची प्रतिमा उंचावतात

First published: October 28, 2017, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading