टॅटूमुळे पसरू शकतात का HIV, मलेरियासारखे जीवघेणे आजार, इथे घ्या जाणून

टॅटूमुळे पसरू शकतात का HIV, मलेरियासारखे जीवघेणे आजार, इथे घ्या जाणून

अनेकदा योग्य माहिती न घेता लोक शरीरावर टॅटू गोंदवून घेतात. टॅटू गोंदवताना फारशी काळजीही घेत नाहीत, त्यामुळे असे प्राणघातक आजार होतात.

  • Share this:

गेल्या अनेक वर्षांपासून टॅटू काढणं हा ट्रेण्ड झाला आहे. विशेष म्हणजे वेळेनुसार हा ट्रेण्ड कमी होत नसून वाढतच चालला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, टॅटूमुळे HIV, मलेरिया किंवा डेंग्यूसारखे भयंकर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. अनेकदा योग्य माहिती न घेता लोक शरीरावर टॅटू गोंदवून घेतात. टॅटू गोंदवताना फारशी काळजीही घेत नाहीत, त्यामुळे असे प्राणघातक आजार होतात. सुरुवातीला या आजारांच्या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र पुढे जाऊन हा आजार गंभीर स्वरुप घेतो. आज आपण टॅटूमुळे कशाप्रकारे आजार पसरू शकतात त्याबद्दल जाणून घेऊ...

जे्हा तुम्ही टॅटू गोंदवायला जाता तेव्हा सुईच्या सहाय्याने रंग शरीराच्या आत टाकला जातो. जेव्हा सुई शरीरात जाते तेव्हा तिचा संपर्क रक्ताशी येतो. तुम्ही टॅटू गोंदवून घेण्यापूर्वी HIV, मलेरिया किंवा डेंग्यूचा एखाद्या रुग्णाने टॅटू काढला असेल तर त्यामुळे तुम्हालाही हे आजार होऊ शकतात.

अशा पद्धतीने करा स्वतःचं संरक्षण-

शरीरावर टॅटू गोंदवून घेण्यापूर्वी तुमच्यासाठी वापरण्यात येणारी सुई चांगल्या पद्धतीने धुवून घेतली की नाही याकडे लक्ष द्या. नवीन सुईने टॅटू काढून घेणं केव्हाही चांगलं. जर सुई चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेतली नसेल तर तिथून टॅटू काढू नका.

कोणत्याही सामान्य ठिकाणावरून टॅटू काढून घेऊ नका. ज्या ठिकाणाहून तुम्ही टॅटू काढून घेणार आहात तिथली चांगल्याप्रकारे चौकशी करा. त्यांच्याकडे टॅटू काढण्याचं लायसन्स आहे की नाही याचीही विचारणा करा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

लग्नानंतर जोडप्यांनी या गोष्टींची काळजी घ्याच, आयुष्यभर राहील नात्यात प्रेम

Ex ला विसरण्याच्या नादात तुम्ही या चुका तर करत नाही ना?

आता प्रेमाला म्हणा नकोच, कारण त्याचाही आहे अनोखा फायदा!

झोपेत पाहिलेलं स्वप्न लक्षात ठेवायचं असेल तर ही गोष्ट नक्की खा!

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

Published by: Madhura Nerurkar
First published: September 10, 2019, 7:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading