सावधान ! तुम्हाला बटाट्याची भाजी आवडते? मग हे नक्की वाचा| Potato vegetable| Disadvantages| Fried Potato|

बटाट्याची भाजी बहुतेकांच्या आवडीची असते. झटपट कोणती भाजी करायची, यावर काही पर्याय असेल तर ती म्हणजे बटाट्याची भाजी.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 08:36 PM IST

सावधान ! तुम्हाला बटाट्याची भाजी आवडते? मग हे नक्की वाचा| Potato vegetable| Disadvantages| Fried Potato|

मुंबई, 29 जून : बटाट्याची भाजी बहुतेकांच्या आवडीची असते. झटपट कोणती भाजी करायची, यावर काही पर्याय असेल तर ती म्हणजे बटाट्याची भाजी. शिवाय, अन्य भाज्यांमध्येही बटाट्याचा समावेश आवडीनं केला जातो. पण या बटाट्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम माहिती झाल्यास तुम्ही जेवणाच्या ताटात बटाटा कधीही घेणार नाही. जाणून घेऊया आहारात बटाट्याचा समावेश केल्यानं शरीरावर होणारे हानिकारक परिणाम

(निरोगी जगायचं आहे? 'या' 7 पदार्थांचा आहारात करा समावेश)

ज्या लोकांना अपचन ,ऍसिडिटी किंवा पोटाशी संबंधीत कोणतीही समस्या आहे त्यांनी बटाट्याची भाजी खाण्यापूर्वी विचार करावा. कारण, या समस्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. दररोज तेलकट बटाटा वडा खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. बटाट्यामध्ये असणारं ग्लाइकोलाइड पोटासाठी हानिकारक असतं. याचा थेट परिणाम पचन संस्थेवर होतो. त्यामुळे अन्नाच्या पचनक्रियेत अडथळा येतो. परिणामी अपचन आणि ऍसिडिटीसारख्या समस्या वाढतात.

तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर बटाट्याची भाजी किंवा त्याचे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. त्यामध्ये असणारं ग्लाइसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे ब्लड शुगरचीही मात्रा वाढते.

(रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा 'हे' कमी कॅलरीयुक्त पदार्थ)

Loading...

बटाटा खाल्ल्याने तुमचं वजन वाढू शकतं. म्हणून डाएट करण्याऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात बटाट्याचा समावेश करू नये. त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं ज्याने वजन वाढतं.

पावसात विजेच्या खांबाला हात लावू नका, सुरतमध्ये काय घडलं पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...