प्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का?

प्रत्येकाच्या शरीराला किमान 8 ग्लास पाण्याचीच गरज असते का?

तुमच्या शरीराला नेमकं किती पाणी (water) हवं हे जाणून घेण्याची एक सोपी पद्धत समजून घ्या.

  • Last Updated: Sep 24, 2020 11:28 PM IST
  • Share this:

पाणी पिणं शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुरेसं पाणी न प्याल्याने बर्‍याच आजारांना निमंत्रण मिळतं. सामान्यपणे दररोज 2 लीटर किंवा किमान आठ ग्लास पाणी प्यावं, असं सांगितलं जातं. मात्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या शरीराला आठ ग्लास पाण्याचीच गरज असते का? कारण ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या आहाराचं प्रमाण वेगळं असतं तसं पाण्याचंही प्रमाण वेगळं असतं का? तर याचं उत्तर आहे हो.

तज्ज्ञांच्या मते, कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावं हे त्याच्या वजनावर अवलंबून आहे. myupchar.com च्या डॉ. मेधवी अग्रवाल यांनी सांगितलं, शरीराच्या वजनानुसार पाणी पिणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सुरुवातीला त्या व्यक्तीने त्याचं वजन मोजणं आवश्यक आहे. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि ती खूप सोपी आहे.

एकदा शरीराचं वजन किलोग्रॅममध्ये तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला 30 ने भागा आणि जी संख्या येईल तितकं लीटर पाणी तुम्ही प्यावं. म्हणजेच, या सूत्रानुसार तुमच्या शरीराच्या वजनानुसार तुमच्या शरीराला किती लीटर पाण्याची गरज आहे, हे समजेल. समजा तुमचं वजन 60 किलो असेल तर त्याला 30 ने भागल्यावर 2 ही संख्या मिळेल. म्हणजेच, 60 किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज 2 लीटर पाणी प्यावं. जर वजन 50 किलो असेल तर 1.6 लीटर (1 लीटर आणि 600 मिली) पाणी प्या.

हे वाचा - मिल्कशेक, चहा-कॉफीत टाका नारळ तेलाचे काही थेंब; आरोग्याला होतील बरेच फायदे

myupchar.com चे डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, पुरेसं पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. पाण्यामुळे वजन वाढत नाही. पाण्यात कर्बोदकांचे प्रमाण बिलकुल नसते. याचा अर्थ असा की आपण भरपूर पाणी प्यायल्या  मोठ्या प्रमाणात कर्बोदकांचे सेवन करणं टाळतो आणि वजन वाढण्याचा धोकादेखील कमी होतो.

दिवसभर वजनानुसार पुरेसे पाणी प्या. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर दर अर्ध्या तासाला किमान एक ग्लास पाणी प्या. याचं कारण म्हणजे व्यायामामुळे शरीरातील घाम निघतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच वेळी जेवणापूर्वी अर्धा लीटर पाणी प्या यामुळे भूक कमी होईल. शिवाय तहान नसली तरी पाणी प्या कारण शरीराला पाण्याची आवश्यकता असते. दिवसभर थोडं-थोडं पाणी पित राहा.

हे वाचा - सकाळी उठल्यानंतर तुमच्याही पाठीत कळ येते का? दुर्लक्ष केल्यास येऊ शकतं अपंगत्व

जर साधं पाणी पिऊन कंटाळा येत असेल तर त्यात चवीसाठी पुदिना, लिंबू किंवा आंबट फळांचा रस मिसळून तुम्ही पिऊ शकता.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 24, 2020, 11:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading