मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दात घासताना टूथपेस्ट किती वापरावी, कधी विचार केलाय? जाणून घ्या याचं उत्तर

दात घासताना टूथपेस्ट किती वापरावी, कधी विचार केलाय? जाणून घ्या याचं उत्तर

टुथपेस्ट किती वापरावी

टुथपेस्ट किती वापरावी

प्रत्येकजण स्वतःच्या दातांची चांगली स्वच्छता व्हावी, यासाठी टूथपेस्ट किती वापरावी? याबाबत संभ्रमात असतो. अनेकांना वाटतं की, जास्त टूथपेस्ट वापरल्यानं दातांची चांगली स्वच्छता होऊ शकते. पण...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : लहान मुलं असोत किंवा ज्येष्ठ, प्रत्येकजण स्वतःच्या दातांची चांगली स्वच्छता व्हावी, यासाठी टूथपेस्ट किती वापरावी? याबाबत संभ्रमात असतो. अनेकांना वाटतं की, जास्त टूथपेस्ट वापरल्यानं दातांची चांगली स्वच्छता होऊ शकते. पण तसं अजिबात नाही. उलट टूथपेस्टच्या अतिवापरामुळे दातांसह तोंडाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, टूथपेस्टचा वापर हा चवीसाठी म्हणून न करता फक्त तोंडात फेस होईल इतकाच करावा. लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती या दोघांसाठी टूथपेस्ट वापरण्याचं प्रमाण हे सारखचं आहे. परंतु मुलांचे दात नाजूक आणि कमकुवत असतात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. चला तर, दात स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे, ते जाणून घेऊया.

दात घासताना किती टूथपेस्ट वापराल?

दातांच्या चांगल्या स्वच्छतेसाठी दर्जेदार टूथपेस्ट वापरणं फायदेशीर ठरू शकतं. हेल्थ डॉट कॉम नुसार, टीव्हीवर किंवा जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणारं टूथपेस्टचं प्रमाण केवळ लोकांना उत्पादनांची माहिती देण्यासाठी असतं. सर्वसाधारणपणे, एवढी टूथपेस्ट वापरल्यानं तोंडाच्या समस्या वाढू शकतात. एखाद्या व्यक्तीनं एका वेळी फक्त वटाण्याच्या आकाराएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे. ही सूचना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवरदेखील लिहिलेली असते. मात्र, त्याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही.

मुलांसाठी ठरू शकते हानिकारक

जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरणं मुलांसाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात टूथपेस्टचा वापरामुळे मुलांचे दुधाचे दात खराब होऊ शकतात. कारण प्रमाणापेक्षा जास्त टूथपेस्टच्या वापरामुळे फ्लोराईड जास्त प्रमाणात तोंडामध्ये जातं, व ते विकसनशील दातांबाबत फ्लोरोसिस नावाची कॉस्मेटिक स्थिती निर्माण करू शकते. कॉस्मेटिक समस्यांमुळे दातांवर पिवळे आणि तपकिरी डाग पडू शकतात, तसंच काही वेळा दातांमध्ये फटदेखील पडू शकते. म्हणूनच प्रत्येकानं वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे.

कमी टूथपेस्ट वापरल्यानेही उद्भवू शकते समस्या

खूप कमी टूथपेस्ट वापरल्यानंदेखील समस्या उद्भवू शकतात. कारण कमी प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यास दात घासताना तोंडात फोम किंवा बुडबुडे तयार होत नाहीत, ज्यामुळे दात व्यवस्थित साफ होणार नाहीत. याशिवाय दातांच्या संरक्षणासाठी फ्लोराईड पुरेशा प्रमाणात मिळणार नाही. तसंच दात घासताना तोंडात पाणी ठेऊ नका. कारण फ्लोराईड दातांवर कार्य करण्यास वेळ घेतं. जर तोंडात पाणी असेल, किंवा ब्रश खूप ओला असेल तर फ्लोराईड त्याचं काम करू शकणार नाही.

माउथवॉश वापरा

तोंडाच्या स्वच्छतेसाठी ब्रश करण्याव्यतिरिक्त माउथवॉशचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे फ्लोराईडचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यासोबतच दात आणि तोंड दोन्ही जंतूमुक्त राहतील. दात स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रमाणात टूथपेस्ट वापरणं आवश्यक आहे. तुम्ही दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

हे वाचा - प्रकृतीच्या तक्रारी दूर ठेवायच्यात? प्या सफरचंदाचा चहा...!

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )

First published:

Tags: Health, Health Tips