Home /News /lifestyle /

अपुरी झोप शरीराला अपायकारक पण अति झोपणंही नाही चांगलं.. वाचा काय होतो परिणाम

अपुरी झोप शरीराला अपायकारक पण अति झोपणंही नाही चांगलं.. वाचा काय होतो परिणाम

रविवारचा दिवस आळसात आणि भरपूर झोपण्यात घालवणार असाल, तर आधी हे वाचा. पुरेशी आणि योग्य झोप शरीराला आणि मनाला किती आवश्यक आहे ते सांगणारा नवा अभ्यास समोर आला आहे.

    लंडन, 26 सप्टेंबर : झोपेत एक समतोल असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कमी झोप त्रासदायक असते त्याचप्रमोण अति झोप घेणं हेही आरोग्यासाठी हानिकारक असतं. अनेक लोक निद्रानाशाच्या समस्येनी त्रस्त असतात. आवश्यकतेपेक्षा अधिकची झोपही हानिकारक असते. शरीराला ज्याप्रमाणे अन्न, पाणी व ऑक्सिजन आवश्यक असतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराला आराम अर्थात, अवयवांना आराम अत्यंत गरजेचा असतो. त्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही झोपही मर्यादित हवी केवळ झोपूनच राहण्यानी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेचा परिणाम शरीर आणि मनावर होत असतो, असं अभ्यासामधून लक्षात आलं आहे. ‘Wiley Interdisciplinary Reviews: Cognitive Science in 2010 या अभ्यासात 4 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या आणि 9 तासांहून अधिक झोप घेणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. पुरेशी झोप का आवश्यक? पुरेशी झोप म्हणजे 7 ते 8 तासांची झोप. त्यापेक्षा कमी झोप शरीराला हानीकारक ठरते. तशी जास्त झोपही हानीकारक ठरते, असं या अभ्यासात दिसून आलं आहे. पुरेशी झोप स्मरणशक्तीसाठी आणि चांगल्या विचारांसाठी अत्यंत गरज असते. झोपेतील वेगवेगळे टप्पे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. डोळ्यांच्या गतिमान हालचाली -rapid eye movement (REM) व डोळ्यांच्या हालचाली न होणं -शांत झोप non-rapid eye movement (non-REM) या बाबी आपल्या शरीरावर परिणाम करतात. झोपेच्या वेळातले न्युरोलॉजिकल बदल हे स्मरणशक्ती, स्वभावावर अधिक परिणामकारक ठरतात. कसा झाला अभ्यास? 28,756 लोकांचे दोन गट तयार करून त्यांच्या झोपेचा अभ्यास करण्यात आला. ज्यात 50 वर्षावरील इंग्लडमधील रहिवासी आणि 45 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे चीनमधील नागरिक होते. अभ्यासासाठी इंग्लडच्या लॉजिट्यूडिनल स्टडी ऑफ एजिंग आणि चाइना हेल्थ एंड रिटायरमेंट लॉन्गिट्यूडिनल स्टडीज याअंतर्गत 2008 ते 2017 पर्यंत लोकांची माहिती गोळा केली होती. काय होते निष्कर्ष? एका गटातले लोक दररात्री चार किंवा त्यापेक्षा कमी तास झोप घेत होते. त्यांच्यातील संवेदना, ज्ञान, स्मरणशक्ती यात झपाट्याने घट झाल्याचं लक्षात आलं. दुसरा गट अधिक झोपणाऱ्यांचा होता. 10 तासांपेक्षा अधिक झोप घेतलेल्यांमध्ये संज्ञात्मक बुद्धिमत्तेत घट आढळून आली. त्यांचा स्वभावही बदलला. याचा अर्थ कमी किंवा अधिक झोपेचा परिणाम तुमच्या दृष्टिकोनावर आणि एकूण आरोग्यावर वाईट परिणाम जाणवला. या अभ्यासत असंही समोर आले की दररोज 7 तासांची झोप हा कालावधी सर्वात उत्तम असून शरीरासाठी लाभदायक आहे. सद्यस्थितीत आरोग्याबाबत सजग राहणं अत्यंत महत्त्वाचं ठरत असताना झोपेकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. आवश्यक तेवढीच झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं समोर येतं. अधिक झोपेमुळे आळस आणि इतर गंभीर समस्येलाही सामोरं जावं लागतं. त्यामुळेच मानवी जीवनात सर्व गोष्टींचा समतोल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Sleep benefits

    पुढील बातम्या