• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • 20, 30 आणि 40 व्या वयातील मासिक पाळी; टप्प्याटप्प्याने कसे होतात बदल वाचा

20, 30 आणि 40 व्या वयातील मासिक पाळी; टप्प्याटप्प्याने कसे होतात बदल वाचा

आपल्याकडे आजही सॅनिटरी पॅड वापरणंच सुरक्षीत मानलं जातं.

आपल्याकडे आजही सॅनिटरी पॅड वापरणंच सुरक्षीत मानलं जातं.

मासिक पाळी (menstrual period) सुरू झाल्यानंतर वयातील प्रत्येक टप्प्यात काही बदल होतात.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  प्रत्येक स्त्रीसाठी मासिक पाळी हा प्रजनन चक्राचा एक नैसर्गिक भाग आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी सामान्यपणे वयाच्या 10 ते 15 व्या वर्षी सुरू होते आणि यौवन सुरू होण्याचं चिन्हं आहे. मासिक पाळीत होणाऱ्या बदलांविषयी भविष्यवाणी करणं अवघड आहे आणि त्यास सामोरं जाणंही कठीण आहे. जर मासिक पाळी प्रत्येक महिन्यात समान कालावधीच्या अंतराने येत असेल तर ती नियमित मासिक पाळी मानली जाते. नियमित चक्राचा कालावधी 21 ते 35 दिवसांपर्यंत असू शकतो. मात्र एका महिन्यात उशिराने, एका महिन्यात लवकर किंवा एखाद्या महिन्यात पाळी न येणं ही अनियमित मासिक पाळी असू शकते. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर वयातील प्रत्येक टप्प्यात काही बदल होतात. 20, 30 आणि 40 या वयानुसार मासिक पाळीतील हे बदल जाणून घेऊया. वयाच्या 20 व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ती अनियमित होणं असामान्य नाही मात्र वयाच्या 20 व्या वर्षी प्रवेश करताना संप्रेरकं किंचित स्थिर असली पाहिजेत, म्हणजेच पाळीचा अंदाज असणं आवश्यक आहे. खरं तर, बर्‍याच स्त्रियांना त्यांचा दिवस आणि वेळ माहित असते की त्यांची पाळी कधी सुरू होईल. जर मासिक पाळी काही काळ उशिराने आली तरी काळजी करू नका. ज्या स्त्रियांची मासिक पाळी वेळेवर येते त्यांचं चक्र देखील अधूनमधून बदलतं. विसावं वय असं आहे, ज्या वयात अनेक कारणांमुळे मुलींना ताण जाणवतो. तणावामुळे अंडमोचनची क्रिया अर्थात दरमाह शरीराची बीज सोडण्याची क्रिया बाधित होऊ शकते. यामुळे मासिक पाळी एकतर उशिरा येईल किंवा येणार नाही. विसाव्या वर्षात येणारा एक शेवटचा बदल म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांमुळे होणारे संप्रेरक बदल. 20 व्या वयात जेव्हा स्त्रिया निरोगी लैंगिक आयुष्याची सुरुवात करतात तसतसे ते संप्रेरक गर्भनिरोधक देखील निवडतात. असं केल्यानं मासिक पाळी नियमित होऊ शकते आणि फिकट असू शकते. myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना म्हणतात की, मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात वेदना होणं, स्तनांमध्ये सूज येणं, स्तन दुखणं, पाठदुखी या सारखी लक्षणं दिसतात. पीरियड्सच्या सुरुवातीच्या वेळेस बहुतेक स्त्रिया लक्षणं अनुभवतात ज्याला प्रिमेनस्ट्रूअल सिंड्रोम म्हणतात. वयाच्या 30 व्या वर्षी हे असंच वय आहे जेव्हा मासिक पाळी नियमितपणे येते आणि सामान्यापेक्षा जास्त स्त्राव होऊ शकतो. यासाठी वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असू शकते. 30 व्या वयात एंडोमेट्रिओसिस आणि फायब्रॉइडची प्रकरणंदेखील सामान्य आहेत. यादरम्यान होणारा आणखी एक मोठा बदल बाळाच्या जन्माशी संबंधित आहे. वयाच्या 30 व्या वर्षी जितकी महिलांना मुले आहेत, तितकी गर्भधारणा स्त्रिच्या मासिक पाळीचे चक्र पूर्णपणे बदलू शकते. हा कालावधीही स्तनपान देण्याशी संबंधित असतो. स्तनपान देणाऱ्या महिलांना मासिक पाळी येऊ शकत नाही जोपर्यंत त्यांनी बाळाला दूध देणं कमी किंवा बंद केलं नाही. वयाच्या 40 व्या वर्षी हा काळ तो असतो जेव्हा मासिक पाळी बंद होण्याच्या दिशेने जात असते. मासिक पाळीची अनियमितता, पाळी न येणं, मासिक पाळीच्या कालावधी दरम्यान स्पॉटिंग म्हणजे हलका रकस्त्राव होऊ शकतो. यावेळी पीएमएस लक्षणं तीव्र होऊ शकतात, जी मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या बदलांसह येऊ शकतात. या वयाच्या अवस्थेत मूड स्विंग्स, हॉट फ्लॅश, रात्रीचा घाम येऊ शकतो. myupchar.com डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, जर मासिक पाळीमध्ये जास्त अनियमितता येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - मासिक पाळीच्या समस्या न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: