मुंबई, 30 ऑगस्ट: तहान लागली की पाणी खूप महत्त्वाचं असतं. पण पाण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
टॅप वाॅटर (Tap Water )
प्रत्येकाच्या घरात नळातून येतं ते पाणी. अमेरिकेत नळातून येणारं पाणी थेट प्यायलं तर चांगलं असतं. पण भारतात अशा पाण्यात अनेकदा जंतू असतात. त्यानं पोट बिघडतं. त्यामुळे ते फिल्टर करूनच प्यावं लागतं.
मिनरल वॉट (Mineral Water)
या पाण्यात मिनरल्स असतात. सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं. तब्येतीला हे पाणी चांगलं. पण सगळे जण हे पाणी पिऊ शकणार नाहीत. ते महागही मिळतं.
स्प्रिंग किंवा ग्लेशियर वॉटर (Spring or Glacier Water)
हे पाणी बाजारात बाटल्यांमध्ये मिळतं. ते स्वच्छ पाणी असतं. तब्येतीला चांगलं. पण ते महागही असतं. हे पाणी फिल्टर नसतं. त्यामुळे काहींना या पाण्यानं आजार होऊ शकतो.
स्पार्कलिंग वॉटर (Sparkling Water)
हे सोडा पाणी किंवा कार्बोनेटेड वाॅटर नावानं ओळखलं जातं. यात कार्बन डाइऑक्साइड गॅस असतो. असं म्हणतात बाजारात मिळणाऱ्या स्पार्कलिंग वाॅटरमध्ये साखर मिसळली जाते. ते तब्येतीला योग्य नाही. हे पाणी महागही असतं.
डिस्टिल्ड वॉटर (Distilled Water)
हे पाणी उकळलेलं असतं. पाण्यातल्या जंतूंपासून बचाव करण्यासाठी ते योग्य. पण यात मिनरल्स नसतात.
प्योरिफाइड वॉटर (Purified Water)
हे पाणी निर्जंतुकीकरण करूनच दिलं जातं. यातले बॅक्टेरिया काढले जातात. हे महाग असतं. प्यायला सुरक्षित असतं.
फ्लेवर पाणी (Flavored or Infuse Water)
यात गोड फ्लेवर टाकला जातो. चवीला हे पाणी चांगलं असलं तरी डायबेटिस रुग्णांना हे पिता येत नाही.
एल्कलाइन वॉटर (Alkaline Water)
या पाण्याचा पीएच लेव्हल चांगली असते. हे पाणी प्यायल्यानं एजिंग प्रक्रिया मंदावते. व्यक्ती बराच काळ तरुण दिसतो.
विहिरीतलं पाणी ( Well Water )
हे पाणी आरोग्याला पूर्ण अपायकारक असतं.
डायबेटिससाठी उपयोगी आहे Camel Milk, जाणून घ्या याचे फायदे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.