• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Hair Care Tips : तरुणांनी केसांना आठवड्यातून किती वेळा लावले पाहिजे तेल?

Hair Care Tips : तरुणांनी केसांना आठवड्यातून किती वेळा लावले पाहिजे तेल?

केसांबाबत सर्वांत मोठी समस्या कोंडा अर्थात डँड्रफ असते. केसांचा कोरडेपणा डँड्रफ होण्यास कारणीभूत ठरतो.

केसांबाबत सर्वांत मोठी समस्या कोंडा अर्थात डँड्रफ असते. केसांचा कोरडेपणा डँड्रफ होण्यास कारणीभूत ठरतो.

केसांबाबत सर्वांत मोठी समस्या कोंडा अर्थात डँड्रफ असते. केसांचा कोरडेपणा डँड्रफ होण्यास कारणीभूत ठरतो.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर : केस गळण्याच्या (hair fall) समस्येबाबत स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक चिंताग्रस्त असतात; मात्र कित्येक पुरुषांना आपल्या केसांची निगा कशी राखावी याबाबत माहिती नसते. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, प्रत्येक पुरुषाने आपल्या केसांची निगा राखण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा डोक्याला तेल (hair oil) लावणं गरजेचं आहे. त्यासाठीही एक विशिष्ट पद्धत असते. खरंतर कित्येक पुरुष केवळ शाम्पूचा वापर करतात आणि केसांना अजिबात तेल लावत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस रुक्ष, कुरळे आणि राठ होतात. असं होऊ नये यासाठी केसांना नियमितपणे तेल लावणं गरजेचं आहे. यामुळे केसांना आवश्यक ते पोषण पुरेशा प्रमाणात मिळतं आणि केसांचं आरोग्य सुधारतं. हेअर ऑइल आपल्या केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं. दुर्दैवाने कित्येक जण या नैसर्गिक कंडिशनरचा वापर न करता कृत्रिम कंडिशनरचा वापर करतात. दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO केसांना पुरेसं पोषण हवं असेल, तर खोबरेल तेल सर्वांत उत्तमरीत्या काम करतं. रात्रभर खोबरेल तेल डोक्याला लावून ठेवल्यामुळे केसांना डीप कंडिशनिंग मिळतं. यानंतर दुसर्‍या दिवशी कोणत्याही माइल्ड शाम्पूचा वापर करून केस धुऊन टाकावेत. असं केल्याने केस अधिक चमकदारही दिसू लागतील. डोक्याला तेल लावण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. उत्तम परिणाम दिसण्यासाठी केवळ वर-वर नाही, तर केसांच्या मुळापर्यंत जाऊ डोक्यावर तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. यामुळे आपल्या स्काल्पमध्ये तेल चांगल्या प्रकारे मुरतं. याचा फायदा रक्ताभिसरणासाठीही होतो. तसंच, केसांची मुळं घट्ट होण्यासही यामुळे मदत मिळते, अशी माहिती 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केली आहे. केवळ केस चमकदार करण्यातच नाही, तर केसांमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठीदेखील नियमित तेल लावणं फायद्याचं ठरतं. तसंच, स्काल्पला पुरेसं पोषण मिळाल्यामुळे केसांची मुळं घट्ट होतात. तसंच, कुरळे केसही नीट होण्यास मदत मिळते. आवडता शर्ट घातला नाही म्हणून पत्नी रागावली; पतीला आला तिच्या मृत्यूचा कॉल केसांबाबत सर्वांत मोठी समस्या कोंडा अर्थात डँड्रफ असते. केसांचा कोरडेपणा डँड्रफ होण्यास कारणीभूत ठरतो. नियमित तेल लावल्यामुळे स्काल्प कोरडं राहत नाही आणि पर्यायाने डँड्रफच्या समस्येपासूनही सुटका मिळते. डँड्रफ कमी झाल्यामुळे त्यामुळे होणारी केसांची गळतीही थांबते. अशा रीतीने केवळ तेल लावण्याची सवय लावून तुम्ही केसांशी संबंधित कित्येक समस्यांपासून सुटका मिळवू शकता.
  First published: