दिवसातून किती वेळा Sex करणं योग्य, तज्ज्ञांचं काय आहे म्हणणं?

दिवसातून किती वेळा Sex करणं योग्य, तज्ज्ञांचं काय आहे म्हणणं?

तज्ज्ञांच्या मते, दिवसाला 4 वेळा लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र तुमच्या जोडीदाराचं समाधान झालं असेल, तर हे योग्य नाही.

  • Share this:

गांधीनगर, 28 फेब्रुवारी : जास्त सेक्स (Sex) केल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? दिवसातून नेमकं किती वेळा सेक्स करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते, दिवसाला 4 वेळा लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र तुमच्या जोडीदाराचं समाधान झालं असेल, तर हे योग्य नाही.

सेक्सोलॉजिस्ट डॉ. पारस शाह (Sexologist Dr. Paras Shah) यांना 'न्यूज 18 गुजरात'द्वारे विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं निरसन त्यांनी केलं आहे.

हेदेखील वाचा - गूड न्यूज ! आता स्त्रियांसाठीही आला Vigra; सुपरमॉडेलनं लाँच केला प्रोडक्ट

डॉ. पारस शाह यांनी सांगितल्यानुसार, "सेक्स हे गोष्टींसाठी केलं जातं, एक मूल होण्यासाठी आणि दुसरं लैंगिक समाधानासाठी. मूल होण्यासाठी ठेवल्या जाणाऱ्य़ा लैंगिक संबंधाचा कालावधी महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रावर अवलंबून असतो. तर लैंगिक समाधानासाठी सेक्स करत असाल तर ती किती वेळा यापेक्षा कसं करता हे महत्त्वाचं आहे"

"दिवसातून 4 वेळा तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता. मात्र तुमच्या जोडीदाराचं समाधान झालं असेल, तर आठवड्यातून फक्त एकदा लैंगिक संबंध ठेवणंही योग्य नाही", असं डॉ. पारस शाह म्हणाले.

डॉ. पारस शाह यांच्या मते, "दिवसातून इतक्या वेळा किंवा आठवड्यातून इतक्या वेळा लैंगिक संबंध ठेवावेत, असा काही नियम नाही. जर जोडीदारांची इच्छा असेल, तर ते लैंगिक संबंध ठेवू शकतात. मात्र जोडीदाराची इच्छा नसेल किंवा तो थकलेला असेल तर तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत नाही."

हेदेखील वाचा - पहिल्यांदाच SEX; काय करावं सूचत नाही; मग या टीप्स रोमान्सचा आनंद करतील द्विगुणित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2020 10:08 PM IST

ताज्या बातम्या