मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'संडो हो या मंडे लिमिट में खाओ अंडे'; एका दिवसात किती अंडी खाऊ शकता?

'संडो हो या मंडे लिमिट में खाओ अंडे'; एका दिवसात किती अंडी खाऊ शकता?

बऱ्याच जणांच्या रोजच्या आहारामध्येही (Daily Diet) अंड्यांचा समावेश असतो; पण अंडी पौष्टिक असली, तरी ठरावीक प्रमाणातच खाणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली, की त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतोच.

बऱ्याच जणांच्या रोजच्या आहारामध्येही (Daily Diet) अंड्यांचा समावेश असतो; पण अंडी पौष्टिक असली, तरी ठरावीक प्रमाणातच खाणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली, की त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतोच.

बऱ्याच जणांच्या रोजच्या आहारामध्येही (Daily Diet) अंड्यांचा समावेश असतो; पण अंडी पौष्टिक असली, तरी ठरावीक प्रमाणातच खाणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली, की त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतोच.

  नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अंड्यांना (Eggs) प्रोटीनचा (Protein) उत्तम सोर्स मानलं जातं. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींनाही प्रोटीन मिळण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. बऱ्याच जणांच्या रोजच्या आहारामध्येही (Daily Diet) अंड्यांचा समावेश असतो; पण अंडी पौष्टिक असली, तरी ठरावीक प्रमाणातच खाणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली, की त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतोच.

  तसंच अंडीही जास्त खाल्ली, तर आरोग्याचं नुकसानच होतं. याबद्दलची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'नं दिली आहे.  रोज किती अंडी खाल्ली पाहिजेत, हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीला झेपतील, एवढीच अंडी खाणं आवश्यक आहे.  ज्यांची प्रकृती सर्वसाधारण असते ते एका आठवड्यात सात अंडी खाऊ शकतात असं एका अभ्यासातून पुढे आलं आहे. आरोग्याची कोणती समस्या नसेल आणि आजारपण नसेल, अशा व्यक्तींनी दिवसातून तीन अंडी खाल्ली तरी काही हरकत नाही, असंही अभ्यासात म्हटलं आहे.

  अंडी नक्कीच पौष्टिक असतात; मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही हवी तितकी अंडी खाऊ शकता. उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ली तर शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे डायरियाही होऊ शकतो. लहान मुलांना अंडी देताना त्यासाठी एक प्रमाण ठरवणं गरजेचं आहे.  तुम्ही रोज अंडी खात असाल, तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे; मात्र त्यासाठी प्रमाण ठरवून घेणं आवश्यक आहे. अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि काही अँटीऑक्सिडंट्स अशी पोषक तत्त्वं असतात. हे घटक नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात; पण तरीही अंड्यांचं सेवन प्रमाणातच केलं पाहिजे.अन्यथा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

  हे ही वाचा-कधी ऐकलं का? समुद्राच्या पाण्यात द्राक्ष सडवून तयार केली जाते वाइन!

  अंडी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली तर शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी वाढते. अंड्यांच्या मधल्या भागात कोलेस्टेरॉल जास्त असतं. एका अंड्याच्या पिवळ्या भागात जवळपास 200 मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असतं. एका व्यक्तीच्या आहारात दररोज 300 मिलिग्रॅमपेक्षा जास्त कोलेस्टेरॉल जाणं हानिकारक असतं असं सांगितलं जातं. याकडे दुर्लक्ष करून जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल शरीरात गेलं तर चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलवर नियंत्रण राहत नाही. शरीरात वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढून फॅट जमा होतं.  ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ’ हे जरी खरं असलं तरी रोज किती अंडी खायची हे तुमच्या डॉक्टरला किंवा डाएटिशियनला विचारणं जास्त चांगलं.

  First published: