मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

झोपल्याशिवाय किती दिवस जगू शकतो माणूस? काय आहे संशोधकांचा दावा?

झोपल्याशिवाय किती दिवस जगू शकतो माणूस? काय आहे संशोधकांचा दावा?

एखादी व्यक्ती झोपत नसेल तर त्याच्या शरीरावर कसा परिणाम होईल? ज्याप्रमाणे आपण काहीच खाल्लं नाही तर शरीर जास्त काळ तग धरू शकत नाही. त्याचप्रमाणे झोपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून झोपणे आणि खाणे-पिणे या जीवनातील आवश्यक क्रिया आहेत ज्या योग्यरित्या पार पडल्या पाहिजेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 20 जून : मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे वेगळे महत्त्व आणि कार्य आहे. जगण्यासाठी ज्याप्रमाणे प्राणवायू, अन्न आणि पाणी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे झोपदेखील तितकीच गरजेची आहे. सर्व वयोगटातील शास्त्रज्ञांनी (Researchers Claim About Sleep) त्यांच्या अभ्यासात वेळोवेळी हे अधोरेखित केले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याच्या शरीराला इंधन भरण्यासाठी आवश्यक वेळ मिळतो आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा त्याला ताजेतवाने वाटते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानप्रेमींनी स्पष्ट केले आहे की, जर एखादी व्यक्ती नीट (Good Sleep) झोपत नसेल तर त्याच्यावर काही धक्कादायक नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते? साधारणपणे एखादी व्यक्ती 8 तासांपर्यंत झोपते. परंतु जर एखादी व्यक्ती झोपत नसेल तर काय? (Survival Without Sleep) त्याच्या शरीरावर कसा परिणाम होईल? आपण इथे असे समजूया की एखादी व्यक्ती अजिबात झोपत नाही (Sleeplessness). मात्र ज्याप्रमाणे आपण काहीच खाल्लं नाही तर शरीर जास्त काळ तग धरू शकत नाही. त्याचप्रमाणे झोपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून झोपणे आणि खाणे-पिणे या जीवनातील आवश्यक क्रिया आहेत ज्या योग्यरित्या पार पडल्या पाहिजेत.

स्वप्नात या 4 गोष्टी पाहणं शुभसंकेत मानले जातात; सुख-समृद्धीमध्ये होते भरभराट

दैनंदिन कामांमुळे झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी झाल्यास व्यक्तीचे आरोग्य बिघडते. यामुळे निद्रानाश (Insomnia) हा झोपेचा विकार होण्याचीदेखील शक्यता असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? की एखादी व्यक्ती जर सलग अकरा दिवस झोपली नाही तर त्याचा मृत्यूही (Lack Of Sleep Cause Death) होऊ शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती झोपेशिवाय केवळ 11 दिवस जगू शकते. हार्वर्डने केलेल्या अभ्यासानुसार, “झोपेची कमतरता थेट आतडे आणि मेंदूवर परिणाम करू शकते आणि यामुळे शरीराचे नुकसान होऊन मृत्यू होऊ शकतो."

व्यायाम करण्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम? हाडांना फायदा की तोटा

व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश वेळ झोपेत घालवते. मात्र असेही होते की, जेव्हा आपण आनंदी आणि उत्साही असतो. तेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला झोप येत नाही. संशोधनात असेही समोर आले आहे की, सुमारे 30% लोकांना असे वाटते की जर ते एका दिवसात सलग सात तास झोपले तर त्यांना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Sleep

पुढील बातम्या