Home /News /lifestyle /

घरी किती दारूच्या बाटल्यांचा करू शकता स्टॉक? महाराष्ट्रासाठी हे आहे नियम

घरी किती दारूच्या बाटल्यांचा करू शकता स्टॉक? महाराष्ट्रासाठी हे आहे नियम

घरात किती दारू साठवून ठेवता येते, हे प्रत्येक राज्याच्या अबकारी धोरणाच्या आधारे ठरवलं जातं.

घरात किती दारू साठवून ठेवता येते, हे प्रत्येक राज्याच्या अबकारी धोरणाच्या आधारे ठरवलं जातं.

घरात किती दारू साठवून ठेवता येते, हे प्रत्येक राज्याच्या अबकारी धोरणाच्या आधारे ठरवलं जातं.

  मुंबई, 27 सप्टेंबर : कोणतीही व्यक्ती परवान्याशिवाय दारू (alcohol) विकू शकत नाही हे सर्वांना माहितीच आहे; पण घरी (home) दारू ठेवण्यासाठीही काही नियम (alcohol license) आहेत. प्रत्येक राज्यात घरी दारू ठेवण्याबाबतचे नियम वेगवेगळे आहेत. तुम्ही घरी दारू ठेवली तरी तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल. कोणीही स्वतःच्या घरात एका मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवू शकत नाही. घरात दारू ठेवण्याबाबतचे काय नियम आहेत ते जाणून घेणं आवश्यक आहे. या नियमांचं पालन केलं नाही, तर कारवाईही होऊ शकते. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. घरात किती दारू साठवून ठेवता येते, हे प्रत्येक राज्याच्या अबकारी धोरणाच्या आधारे ठरवलं जातं. दिल्लीतल्या (Delhi) नियमांबाबत सांगायचं झालं, तर दिल्लीत 18 लिटरपेक्षा जास्त दारू घरी साठवून ठेवू शकत नाही. यामध्ये वाइन, अल्कोपॉप किंवा बिअरचा समावेश आहे. 9 लिटरपेक्षा जास्त भारतीय किंवा परदेशी रम, व्हिस्की, वोडका, जिन घरी ठेवता येत नाही. तसंच दिल्लीच्या बाहेर फक्त एक लिटर दारू घेऊन जाता येतं. याशिवाय परदेशातून येणारी व्यक्ती दिल्लीत आपल्यासोबत 2 लिटर दारू ठेवू शकते. हुश्श! सहा महिन्यांत पहिल्यांदा कोरोना ACTIVE CASES 3 लाखांच्या खाली गोव्यात (Goa) कोणतीही व्यक्ती बिअरच्या 24 बाटल्या, IMFL च्या 12 बाटल्या आणि देशी दारूच्या 18 बाटल्या घरात ठेवू शकते. महाराष्ट्रात (Maharashtra) तुम्ही तुमच्या घरी दारूच्या 8 बाटल्या ठेवू शकता. राजस्थानमध्ये (Rajasthan) तुम्ही IMFL च्या 12 बाटल्या घरी ठेवू शकता. यामध्ये काही दारूसाठी नियम वेगळे आहेत. तसंच पार्टीसाठी वेगळा नियम आहे. तुम्हाला पार्टीसाठी 2 हजार रुपये आणि बिझनेस पार्ट्यांसाठी आणखी काही पैसे भरून परवाना मिळवावा लागेल. हरियाणामध्ये (Haryana) देशी दारूच्या 6 बाटल्या, भारतात बनवलेल्या विदेशी दारूच्या 18 बाटल्या घरी ठेवता येतात. तुम्हाला यापेक्षा जास्त दारू ठेवायची असेल, तर दर वर्षी 200 रुपये किंवा कायमसाठीचे 2 हजार रुपये देऊन परवाना घ्यावा लागेल.

  ED च्या जाळ्यातून तुर्तास वाचले अडसूळ, तब्बल 14 तास होते अधिकारी हॉस्पिटलमध्ये

  उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तुम्ही 6 लिटरपर्यंत दारू आपल्यासोबत ठेवू शकता. नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला 6 लिटर दारू खरेदी, वाहतूक आणि वैयक्तिक ताब्यात ठेवण्याची परवानगी आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त दारू घरात ठेवायची असेल तर तुम्हाला परवाना घ्यावा लागेल. या परवान्यासाठी तुम्हाला दर वर्षी 12 हजार रुपये भरावे लागतील. पंजाबमध्ये (Punjab) भारतात बनवलेल्या विदेशी दारूच्या 2 बाटल्या किंवा कोणत्याही आकाराच्या परदेशातून आणलेल्या दोन बाटल्या किंवा एक केस (650 ML) बिअर किंवा देशी दारूच्या 2 बाटल्या घरी ठेवता येतात. यापेक्षा जास्त दारू घरात ठेवायची असेल तर परवाना घ्यावा लागतो. या परवान्याचं शुल्क वर्षासाठी 1 हजार रुपये किंवा आजीवन 10 हजार रुपये आहे.
  First published:

  Tags: Alcohol

  पुढील बातम्या