Home /News /lifestyle /

Omicron वर मात केल्यानंतर शरीरात इम्युनिटी किती दिवस टिकते? तज्ज्ञ काय सांगतात?

Omicron वर मात केल्यानंतर शरीरात इम्युनिटी किती दिवस टिकते? तज्ज्ञ काय सांगतात?

omicron

omicron

ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये गंभीर लक्षणे समोर आलेली नाहीत. तसेच, ओमिक्रॉनमधून बरे होणाऱ्यांची प्रतिकारशक्तीही चांगली असेल. नवीन प्रकारावर मात केल्यानंतर ही प्रतिकारशक्ती लोकांच्या शरीरात दीर्घकाळ टिकू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    मुंबई, 16 जानेवारी : कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) भारतासह अनेक मोठ्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराच्या प्रसाराचा वेग पूर्वीच्या डेल्टा व्हेरियंटच्या (Delta variant) तुलनेत खूपच जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तज्ज्ञ असेही सांगत आहेत की ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये गंभीर लक्षणे समोर आलेली नाहीत. तसेच, ओमिक्रॉनमधून बरे होणाऱ्यांची प्रतिकारशक्तीही (Immunity) चांगली असेल. नवीन प्रकारावर मात केल्यानंतर ही प्रतिकारशक्ती लोकांच्या शरीरात दीर्घकाळ टिकू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल? एका नवीन अहवालानुसार, 88 टक्के केसेसमध्ये ओमिक्रॉन संसर्गाद्वारे तयार केलेले कोरोना व्हायरस अॅंटीबॉडीज् शरीरात किमान सहा महिने राहतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे अँटीबॉडीज कोरोना संसर्गास असुरक्षित असलेल्या लोकांना संरक्षण देतात. सहा महिन्यांनंतर, या अँटीबॉडीजचे संरक्षण दर 74 टक्क्यांपर्यंत घसरते. Corona Vaccination Campaign: Corona चं सुरक्षा कवच..! लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण ईस्ट अँजिलिया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ प्रोफेसर पॉल हंटर यांनी म्हटलं की, 'ओमिक्रॉन किंवा इतर कोणत्याही व्हेरिएंटमुळे तुमची प्रतिकारशक्ती सुधारते. मग ही प्रतिकारशक्ती त्या प्रकाराविरुद्ध अधिक प्रभावी होते. मात्र, त्यानंतरही ते इतर लोकांना संक्रमित करत आहे. बाधितांवर केलेल्या अभ्यासानुसार, व्हायरसच्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या शरीरात अँटी-एन अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत आणि त्यामुळे बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर व्हायरसचा विशेष प्रभाव पडत नाही. बूस्टर डोसचा परिणाम ओमिक्रॉन सारख्या अधिक जास्त म्युटेशन असणाऱ्या व्हेरिएंटविरूद्ध लस कमी प्रभावी असल्याचे आढळले आहे. बूस्टर डोस त्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात संरक्षण निर्माण करतो. साउथॅम्प्टन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील सेंटर फॉर क्लिनिकल रिसर्चचे प्रोफेसर सॉल फॉस्ट म्हणतात की आमच्या अभ्यासातील सर्व लसी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून येते. स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वेळीच व्हा सावध; निशुल्क मिळणारी ही गोष्ट त्यावर आहे प्रभावी भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 70 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत एकूण 314 मृत्यू झाले आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनची आतापर्यंत 7,743 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Corona, Health, Omicron

    पुढील बातम्या