मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना लस तुम्हाला किती कालावधीसाठी सुरक्षा देऊ शकते?

कोरोना लस तुम्हाला किती कालावधीसाठी सुरक्षा देऊ शकते?

कोरोनापासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरणावर (Corona vaccination) भर दिला जात आहे. पण ही लस (Corona vaccine) किती कालावधीपर्यंत संरक्षण देऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोरोनापासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरणावर (Corona vaccination) भर दिला जात आहे. पण ही लस (Corona vaccine) किती कालावधीपर्यंत संरक्षण देऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोरोनापासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरणावर (Corona vaccination) भर दिला जात आहे. पण ही लस (Corona vaccine) किती कालावधीपर्यंत संरक्षण देऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होतो.

    नवी दिल्ली, 26 एप्रिल : सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Second Wave) कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (New Verient) संशोधकांना आश्चर्यचकित केलं आहे. या स्थितीत लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. परंतु लशीमुळे (Vaccine) किती कालावधीपर्यंत बचाव होऊ शकेल,असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

    कोरोना प्रतिबंधक लस किती कालावधीपर्यंत सुरक्षा देऊ शकेल,यावर संशोधक देखील कोणताही दावा करण्याच्या स्थितीत नाहीत. लस किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी ते आता लस घेतलेल्या लोकांचे निरीक्षण करण्यावर भर देत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे आणि त्यासाठी किती अतिरिक्त डोसची (Additional Doses) गरज भासू शकते याची पडताळणी करण्यावरही संशोधकांचा भर आहे.

    वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील लस संशोधक डेबोरा फुलर यांनी सांगितलं की, जेव्हा लशींवर अभ्यास केला जातो, तेव्हाच अशाच प्रकारची माहिती उपलब्ध होते. आम्हाला लस घेतलेल्या लोकांचा अभ्यास करावा लागतो. आणि हे देखील पाहावे लागते की कोणत्या वेळी लोकांना पुन्हा विषाणूची लागण होत आहे.

    सहा महिने ते एक वर्षापर्यंत लस ठरु शकते प्रभावी

    आतापर्यंत सुरू असलेल्या फायझर लशीच्या (Pfizer Vaccine) ट्रायलवरून असं दिसतं की ही लस किमान 6 महिन्यांपर्यंत प्रभावी ठरू शकते. परंतु अधिक काळ ही लस प्रभावी ठरू शकेल अशी चिन्हं देखील दिसत आहेत. मॉडर्ना कंपनीची लस (Moderna Vaccine) घेतलेल्या लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर विषाणूशी लढणाऱ्या अँटीबॉडी (Antibody) निश्चित स्तरावर पोहोचण्यासाठी 6 महिने लागतात.

    हे वाचा - कोरोना लशीबाबत मोठा निर्णय होणार? लस उत्पादक कंपन्यांकडे केंद्राने केली एक मागणी

    पण अँटीबॉडीजमुळे सर्वकाही स्पष्ट होत नाही. बाह्य विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिकार यंत्रणेमध्ये बी आणि टी पेशी नावाच्या संरक्षणाची दुसरी भिंत देखील असते.अँटीबॉडीजचा स्तर कमी झाल्यानंतरही यापैकी काही पेशी (Cells) शिल्लक राहतात. जर भविष्यात परत विषाणूचा संसर्ग झाला तर या पेशी त्यांचे कार्य वेगात सुरू करतात. जर बी आणि टी पेशी रोगाला थोपवू शकल्या नाहीत तर त्या रोगास गंभीर बनवतात. परंतु कोरोना काळात या पेशी अशी भूमिका कशी आणि किती काळ निभावू शकतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    आयुष्यभर लस प्रभावी ठरू शकेल?

    मेरीलँड युनिव्हर्सिटीतील संशोधक कॅथलीन नेयुजिल यांनी सांगितलं, कोरोना प्रतिबंधक लस किमान 1 वर्ष प्रभावी ठरणं आवश्यक आहे. परंतु, गोवर लशीप्रमाणे ती आयुष्यभर प्रभावी ठरू शकेल असं नाही. ही एक मोठी व्यापक गोष्ट आहे.

    हे वाचा - BMC म्हणतेय, 1 मेपासून 18+ मुंबईकरांना कोरोना लस नका देऊ कारण...

    अतिरिक्त डोस घेण्यामागे व्हायरसचा नवा व्हेरियंट हे कारण असू शकतं. सध्या दिल्या जाणाऱ्या सर्व लशी कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनवर (Spike Protein) काम करतात. इमोरी लसीकरण केंद्राचे मेहुल सुथार यांनी सांगितलं की, विषाणू जर सातत्याने जास्त प्रमाणात म्युटेट झाला तर अधिक प्रभावी ठरण्यासाठी आपल्याला लस देखील अपडेट करावी लागेल. आतापर्यंतच्या लशी या कोरोनाच्या सर्व व्हेरियंटवर प्रभावी ठरताना दिसत आहे.

    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine