रात्री पुरेशी झोप न घेतल्याने त्वचेवरही होतोय दुष्परिणाम

रात्री पुरेशी झोप न घेतल्याने त्वचेवरही होतोय दुष्परिणाम

  • Last Updated: Jul 15, 2020 10:36 PM IST
  • Share this:

उन्हात जाणे, धूर, धूळ, आहार अशा अनेक गोष्टींचा त्वचेवर परिणाम होत असतो. याशिवाय आणखी एक गोष्ट आपल्या त्वचेवर परिणाम करते, ती म्हणजे झोप. नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या माहितीनुसार, प्रौढ व्यक्तींनी रोज रात्री 7 ते 9 तास झोप घेतली पाहिजे. जर नियमितपणे रात्रीची झोप घेतली तर त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसून येतो. जेव्हा व्यक्ती झोपते त्याचे संपूर्ण शरीर त्वचेसह आराम करते. जर व्यक्तीने आराम केला नाही तर त्वचा कुठलीही हानी किंवा सूज दुरुस्त करू शकत नाही. झोपेची कमतरता जखमा भरण्यात त्रासदायक ठरते, त्वचेवर सूज वाढवते, तारुण्य पिटीकांचादेखील त्रास होतो.

झोप आणि कोलेजनचा संबंध

चांगली झोप होत असेल तर शरीरातील कोलेजनचे प्रमाण योग्य राहते. जर गाढ आणि चांगली झोप घेतली तर कोलेजन शरीराची त्वचा नरम आणि सुंदर ठेवते. myUpchar.com चे डॉ. आयुष पांडे यांचे म्हणणे आहे की कोलेजनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा त्वचा चमकदार आणि निरोगी राखण्यासाठी होतो. हे प्रोटीन त्वचेला लवचिकता देते त्याने आपण तरुण आणि स्वस्थ दिसतो. त्यात त्वचेत ओलावा राखते.

ग्रोथ हार्मोनवर परिणाम

झोपेची कमतरता ग्रोथ हार्मोनची पातळी कमी करते. myUpchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल सांगतात की,  ग्रोथ हार्मोन आयुष्यभर पेशी आणि शरीराच्या अवयवांना निरोगी राखण्यात मदत करतात. ग्रोथ हार्मोन मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीमध्ये तयार होतात. मानवी शरीर झोपेच्या पहिल्या काही तासात ग्रोथ हार्मोन स्रवत असते. म्हणूनच योग्य आराम जर मिळाला नाही तर ग्रोथ हार्मोन योग्य प्रमाणात तयार होत नाही त्यामुळे त्वचा पातळ राहते. त्यामुळे कोलेजन आणि लवचिक पेशी तुटू शकतात आणि परिणामी त्वचा सैल होते त्यावर सुरकुत्या पडतात.

काळी वर्तुळे

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे काही प्रमाणात अनुवांशिक असू शकतात. पण झोपेची कमतरता त्यांना अधिक वाढवते. अपुरी झोप डोळ्यांच्या खालची त्वचा काळी होते. कमी झोपेमुळे डोळ्याखालील रक्तवाहिन्यांची काम करण्याची प्रक्रिया मंदावते त्यामुळेच काळी वर्तुळे दिसू लागतात, आणि डोळे सुजलेले दिसतात.

रक्ताभिसरण

चांगल्या झोपेने रक्ताभिसरण चांगले होते, त्याने त्वचा उजळ दिसते. झोप चांगली असेल तर तर पेशी कुठल्याही अडचणीशिवाय उत्तम काम करतात. त्यामुळे त्वचेवर ताजेपणा, उजळपणा येतो.

त्वचेची निगा.

झोपल्याने त्वचेची निगा राखली जाते आणि तजेला मिळतो. धूळ, यूव्ही किरणे आणि प्रदूषणाने त्वचेला जी हानी पोहोचलेली असते ती झोपल्यावर भरून निघते. या काळात हानी झालेल्या पेशी ठिक होतात आणि पुन्हा कार्यरत होतात. या प्रक्रियेत बाधा आली तर मग त्वचा खराब राहते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख  - त्वचेचे विकार आणि रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 15, 2020, 10:36 PM IST
Tags: sleep

ताज्या बातम्या