• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कोरिअन महिला कधी जाड होत नाहीत, सडपातळ राहण्यामागचं हे आहे कारण

कोरिअन महिला कधी जाड होत नाहीत, सडपातळ राहण्यामागचं हे आहे कारण

  • Share this:
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: झिरो फिगरची ( Zero Figure) क्रेझ महिला वर्गामध्ये असल्याचं दिसून येतं. बहुतांश महिलांना सडपातळ व्हायचं असतं. झीरो फिगरच्या आकर्षणामुळे अनेक महिला दिवसातून एकदाच जेवतात, रात्रीचं जेवणं टाळतात. बऱ्याचदा काहीच न खाल्याने वजन कमी होतं अशी गैरसमजूत असते; मात्र याचा परिणाम उलट होते. चुकीचं डाएटिंग केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. सडपातळ बांधा असलेल्या अभिनेत्री नेमकं काय बरं करत असतील, असा प्रश्न अनेकींना पडतो. जगातल्या सर्वांत सडपातळ स्त्रिया कोणत्या देशात आहेत, याची यादी काढली तर त्या यादीमध्ये कोरियन स्त्रियांचा (how Korean Women remain slim) नंबर वरचा लागतो. कोरियात आरोग्याला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. सडपातळ राहण्यासाठी काही खास कोरियन टिप्स (Korean Tips) पाहू या. 'झी न्यूज'ने त्याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. कोरियन महिला आपल्या आहारात आंबवलेल्या पदार्थांचा ( Fermented Foods) समावेश करतात. आंबवलेलं अन्न खाल्याने पचनसंस्था सुधारते. Alert! कांद्यामुळे 652 जणांना गंभीर संसर्ग; चुकूनही खाऊ नका असा Onion तसंच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. फर्मेंटेड फूड्स आपल्या रोजच्या आहारात काही प्रमाणात समाविष्ट करायला हवं. कोरियन नागरिक संतुलित आहार (Diet) घेतात. प्रथिनांपासून कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सपर्यंत सर्व काही त्यांच्या आहारात असतं; पण हे अगदी संतुलित (Balanced) प्रमाणात असतं. खूप प्रमाणात काहीही खाणं तिथल्या महिला टाळतात. भाज्या हा त्यांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक भाज्या फायबरयुक्त आणि कॅलरीज (Calories) कमी असलेल्या असतात. हेच कोरियन महिलांच्या सडपातळपणाचं आणि निरोगी (Healthy) राहण्याचं मोठं रहस्य आहे. कोरियन महिला बाहेरचे पदार्थ (food) खाणं कटाक्षाने टाळतात. पौष्टिक आणि घरगुती खाद्यपदार्थ, तसंच सॅलड खाण्यावर त्यांचा भर असतो. तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य अन्नपदार्थांची निवड करणं हेदेखील त्यांच्या फिट राहण्यामागचं कारण आहे. फास्ट फूडमुळे वजन वाढतं. त्यामुळे कोरियन महिला मुख्यतः घरगुती अन्नाला प्राधान्य देतात. निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी उपवास आहे गरजेचा; नवं संशोधन आलं समोर कोरियन महिला चालण्याचा व्यायाम (walk) करतात. तिथल्या महिला बहुतेकवेळा पायी जाणं पसंत करतात. शरीराची हालचाल होत राहणं महत्त्वाचं असतं. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होतं. चांगल्या आरोग्यासाठी मासे (सी-फूड) खाण्यावरही कोरियन महिलांचा भर असतो. फिटनेसमध्ये सी फूडदेखील महत्त्वाची भूमिका बजावतं. मासे खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. कोरियामध्ये seaweed हा सर्वांत जास्त खाल्ला जाणारा एक पदार्थ आहे. प्रत्येक गोष्टीत त्याचा वापर केला जातो. जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या seaweed मध्ये फायबरदेखील मोठ्या प्रमाणात असतं. हे पचनास मदत करतं. तसंच त्यामुळे लवकर भूकही लागत नाही. अर्थात, प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, तसंच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी असलेल्या वातावरणानुसार वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेणं आवश्यक असतं. इथे सांगितलेले उपाय हे केवळ माहितीसाठी आहेत. आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी आपल्या प्रकृतीचा अंदाज घेणं आणि आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
First published: