Elec-widget

बापरे! बर्फात गोठलेल्या मांजराला असं मिळालं नवं आयुष्य!

काहींनी बर्फात गोठलेली मांजर पाहिली. अर्धमेल्या अवस्थेत तिला आमच्याकडे आणण्यात आलं. जेव्हा ती मांजर आमच्याकडे आणण्यात आली तेव्हा तिच्या शरीराचं तापमान फार कमी होतं.

  • Share this:

अमेरिकेत थंडीच्या दिवसांमध्ये  तापमान अनेकदा 0 अंश सेल्सियसच्या खाली जातं. या फेब्रुवारीमध्ये हे तापमान चक्क उणे 40 अंश सेल्सियसपर्यंत गेले होते. यादरम्यान केस धुतल्यानंतर महिलेचे केस थंडीमुळे घट्ट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

एवढंच नाही तर गरम कॉफीचं बाहेरच्या तापमानामुळे बर्फ झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान यूएस येथील नॉर्थवेस्ट मोन्टाना शहरातील Kalispell परिसरात अशीच काहीशी घटना घडली होती.

Kalispell येथील घटनेत प्रचंड थंडीमुळे एक मांजर बर्फात गोठल्याचे फोटो व्हायरल झाले होते. बर्फात गोठलेल्या मांजरीचे फोटो Animal Clinic of Kalispell या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले होते.

क्लीनिककडून शेअर करण्यात आलेल्या या फोटोंसोबत लिहिण्यात आले होते की, ही आमची या आठवड्यातील सर्वोत्तम प्राण वाचवल्याची घटना आहे. काहींनी बर्फात गोठलेली मांजर पाहिली. अर्धमेल्या अवस्थेत तिला आमच्याकडे आणण्यात आलं.

जेव्हा ती मांजर आमच्याकडे आणण्यात आली तेव्हा तिच्या शरीराचं तापमान फार कमी होतं. अनेक तासांनंतर ती सामान्य तापमानात आली. आता तिची तब्येत ठीक असून तिचे केस फार सुंदर आहेत.

Loading...

Animal Clinic of Kalispell ने फेसबुकवर ही पोस्ट केल्यावर जवळपास 10 हजारांहून अधिक लाइक्स आणि ५ हजारहून अधिक शेअर होते.

उत्तर ध्रुवाकडून आलेल्या पोलर वोर्टेक्समुळे अमेरिकेतील काही भागात तेव्हा जगभरातील सर्वाधिक ठंडी होती.

ज्या महिलेचे केस गोठल्याचे फोटो व्हायरल झाले होते त्याचा एक व्हिडीओ टेलर स्कॅलन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...