Home /News /lifestyle /

Children's height : आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात? कारणही आहे तसंच खास

Children's height : आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात? कारणही आहे तसंच खास

पालकांमध्ये पुरेशा पोषक तत्वांची उपस्थिती किंवा कमतरता आणि त्यांच्यामध्ये असलेले आजार मुलाच्या उंचीला 20% पर्यंत प्रभावित करतात. आई-वडिलांच्या शरीराशी संबंधित घटकांचा मुलांवर परिणाम होतोच.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी: घरातील मुलांची उंची (Children's height) अनेकदा त्यांच्या पालकांपेक्षा म्हणजे आई-वडिलांपेक्षा जास्त असते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण असं का होतं, याचा कधी विचार केला आहे का? अनेक शास्त्रज्ञांनी याचं उत्तर जाणून घेण्यासाठी संशोधन केलं आहे. संशोधनानुसार, यामागे अशी अनेक कारण आहेत, ज्यामुळं मुलांची उंची पालकांपेक्षा (Parents) जास्त असते. जाणून घेऊ याचं शास्त्रीय कारण. उंचीमध्ये फरक अनेक कारणांमुळं होतो बीबीसीच्या ऑनलाइन मॅगझिन सायन्स फोकसच्या रिपोर्टनुसार, पालक आणि मुलांमधील उंचीचा संबंध त्यांच्या जनुकांसारखा असतो. परंतु, असे आणखीही बरेच घटक आहेत, जे उंचीवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, पालकांमध्ये पुरेशा पोषक तत्वांची उपस्थिती किंवा कमतरता आणि त्यांच्यामध्ये असलेले आजार मुलाच्या उंचीला 20% पर्यंत प्रभावित करतात. आई-वडिलांच्या शरीराशी संबंधित घटकांचा मुलांवर परिणाम होतोच. पण देश बदलला की, काही प्रमाणात तोही बदलतो, असं झी न्यूजनं दिलेल्या बातमीत म्हटलंय. हे वाचा - तुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का? हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert या देशांमध्ये इतकी जास्त असते उंची सोप्या शब्दात सांगायचं तर, ऑस्ट्रेलियात केलेल्या संशोधनानुसार, येथील मुलं त्यांच्या वडिलांच्या उंचीपेक्षा 1% उंच आहेत. तर, मुलींची उंची त्यांच्या आईपेक्षा 3% जास्त आहे. नेदरलँडमध्ये हा आकडा दुप्पट आहे. येथील मुलांची उंची त्यांच्या वडिलांपेक्षा सुमारे 2% जास्त आहे आणि मुलींची उंची त्यांच्या आईपेक्षा सुमारे 6% जास्त आहे. संशोधनात असं म्हटलंय की, मुलांची उंची इथं दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी-अधिक असू शकते. शिवाय, पालकांचं आरोग्य आणि आहार यावरही मुलांची उंची अवलंबून असते. हे वाचा - कमी उंची असलेले पुरुष असता जास्त Sexually Active, संशोधनातून माहिती उघड मुलांची आणि मुलींची उंची अहवालानुसार, मुलांपेक्षा मुलींची उंची वेगानं वाढते. असं का होतं? यासंबंधीच्या हेल्थलाइनच्या अहवालात म्हटलंय की, याचा थेट संबंध किशोरवयात (Teenage) बाहेर पडणाऱ्या हार्मोन्सशी असतो. यामध्ये थायरॉईड, वाढीशी संबंधित संप्रेरकं आणि सेक्स हार्मोन्सची भूमिका असते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Parents and child

    पुढील बातम्या