अवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण?

अवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण?

फेब्रुवारीत अमरावतीत झपाट्याने वाढणारी कोरोना प्रकरणं (Amaravati corona cases) लॉकडाऊननंतर (Amravati lockdown) मार्चमध्ये मात्र लक्षणीयरित्या कमी झाली.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोना लॉकडाऊनबाबत (Maharashtra corona lockdown) घेतलेल्या बैठकीत अमरावती लॉकडाउन मॉडेलचं (Amaravati Lockdown)उदाहरण दिलं होतं.  अमरावती लॉकडाऊन मॉडेल संपूर्ण राज्यभरात आधीच राबवलं गेलं असतं, तर महाराष्ट्रात आज जो कोरोनाचा कहर झाला आहे तो झालाच नसता, असं अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी त्या बैठकीत सांगितलं. नेमकं हे अमरावती लॉकडाऊन मॉडेल आहे तरी कसं?

फेब्रुवारी महिन्यात विदर्भातल्या अमरावतीत कोविड-19 च्या (Covid19) बाधितांची संख्या वेगाने वाढली. जानेवारीत अमरावतीतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 300 ते 500च्या दरम्यान होती. 3 फेब्रुवारीला अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 506 झाली आणि त्यानंतर ती वेगाने वाढतच गेली.

3 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 12 पटींनी वाढून 6740 वर पोहोचली. फेब्रुवारीत दर आठवड्याला रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत होती.

तारीख        अॅक्टिव्ह रुग्ण संख्या    झालेल्या बदलाची टक्केवारी

3 फेब्रुवारी              506

10 फेब्रुवारी            1433                            183.2 टक्के वाढ

17 फेब्रुवारी            3468                              142 टक्के वाढ

24 फेब्रुवारी           6178                             78.14 टक्के वाढ

3 मार्च                   5896                              4.56 टक्के घट

10 मार्च                 5259                              10.8 टक्के घट

17 मार्च                  3697                              29.7 टक्के घट

24 मार्च                3695                               0.05 टक्के घट

हे वाचा - Maharashtra Lockdown : संचारबंदीत पोटापाण्याचं काय? CM ठाकरेंनी केली अशी तरतूद

कोरोना विषाणूच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी अमरावतीत वीकेंड लॉकडाउन लागू केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. 17 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत 78 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन 2710 नवे रुग्ण नोंदवले गेले. वीकेंड लॉकडाऊनला बाजारपेठा आणि सार्वजनिक स्थळं बंद होती. जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या आणि धार्मिक कार्यक्रमांना केवळ पाचच जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. तो पुढे एक मार्चपासून आठ मार्चपर्यंत वाढवण्यात आला. या लॉकडाऊनमधून बहुतांश औद्योगिक आणि आर्थिक व्यवहारांना सवलत देण्यात आली. कुठेही लोकांची गर्दी होणार नाही, यावरच लक्ष केंद्रीत करण्यात आलं.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. लोकांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत खरेदीची परवानगी देण्यात आली. शाळा, कोचिंग क्लासेस बंद होते. सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

सरकारी कार्यालयं आणि बँका 15टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात आल्या. मालवाहतूक आणि उद्योगांना सवलत देण्यात आली. रेस्टॉरंट्स, हॉटेल्समधून पार्सल सेवा सुरू होती.

हे वाचा - Maharashtra: राज्यात कठोर निर्बंध लागू, काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर

या लॉकडाउनचा चांगला उपयोग झाल्याचं पाहायला मिळालं. 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या आठवड्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या (Active Caseload) 4.56 टक्क्यांनी घटल्याचं दिसून आलं. पुढचे काही आठवडे नवी रुग्णसंख्या घटत गेल्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही कमी होत गेली. त्यामुळे रुग्णालयांवरचा आणि जिल्हा प्रशासनावरचा ताणही कमी होत गेला.

3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातली रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96 टक्के, तर मृत्यूदर 1.8 टक्के होता. मधल्या काळात ही परिस्थिती बिघडत गेली. 26 फेब्रुवारी रोजी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 79.1 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. लॉकडाऊननंतरच्या काळात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92टक्क्यांवर पोहोचलं आहे तर मृत्यूदरही (Fatality Rate) कमी होऊन 1.8 टक्क्यांवरून 1.3 टक्क्यांवर आला आहे. 8 मार्च रोजी हा कडक लॉकडाऊन संपला. यानंतर नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं.

First published: April 14, 2021, 7:17 AM IST

ताज्या बातम्या