Home /News /lifestyle /

तुमच्यापर्यंतही पोहोचू शकतो पक्ष्यांचा जीव घेणारा व्हायरस; वेळीच ओळखा लक्षणं

तुमच्यापर्यंतही पोहोचू शकतो पक्ष्यांचा जीव घेणारा व्हायरस; वेळीच ओळखा लक्षणं

बर्ड फ्लू (Bird Flu) या जीवघेण्या आजाराचा माणसांनाही संसर्ग होऊ शकतो.  त्याबाबत काय खबरदारी घ्यावी, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

    मुंबई, 11 जानेवारी : कोरोनाची (Corona) लाट ओसारत नाही तेच राज्यावर (Maharashtra)  आता बर्ड फ्लूचे (bird flu) संकट कोसळले आहे. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे (Bird Flu)   पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा जीवघेणा आजाराचा माणसांही होऊ शकतो. त्यामुळे बर्ड फ्लू  म्हणजे काय?, त्याची लक्षणं आणि त्याबाबत काय खबरदारी घ्यावी, हे जाणून घेणं आवश्यक आहे. बर्ड फ्लूचे अनेक प्रकार आहेत. यात 5 विषाणूंचा समावेश असतो. एच7एन3 (H7N3), एच7एन7(H7N7), एच9एन2(H9N2) आणि एच5एन1 (H5N1) हे त्याचे प्रकार आहेत. यात एच5एन1 प्रकार सर्वाधिक धोकादायक असतो. हा विषाणू सातत्याने स्ट्रेन बदलतो. हाच विषाणू सध्या देशभरात थैमान घालतो आहे. एच5एन1 बर्ड फ्लूला एवियन एन्फ्लुएंझादेखील (Avian Influenza) म्हटलं जातं.  हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. जो पक्ष्यांमुळे माणसांना देखील होऊ शकतो. वेळेत उपचार मिळाले नाही तर हा आजार जीवघेणा ठरतो. वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, 1997 मध्ये सर्वप्रथम हा आजार आढळून आला. याच्या संसर्गामुळे सुमारे 60 टक्के लोकांचा मृत्यू झाला होता. ज्या भागात पक्ष्यांचे प्रमाण मोठे असते, त्या भागात या विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होतो. जो कोणी या पक्ष्यांच्या संपर्कात येतो, त्यास या विषाणूचा संसर्ग होतो. कोंबड्यांपासून माणसांमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. श्वसनाद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. Numerology 21 व्या शतकातलं हे 21 वं वर्षं, 21 आकड्याबद्दल जाणून घ्या या गोष्टी माणसांमध्ये याची सामान्य लक्षणे दिसून येतात. यात सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, सातत्याने उलट्या होणे या लक्षणांचा समावेश असतो. बर्ड फ्लूची लक्षणं - सातत्यानं कफ - नाक वाहणं - डोकेदुखी -घशाला सूज येणं - स्नायू दुखणं - जुलाब होणं - मळमळणं - पोटाखालील भागात वेदना - श्वास घेण्यास त्रास होणं, न्युमोनिया - डोळ्यात कंजक्टिव्हाइटीस Video: धोनीच्या मुलीची पाचव्या वर्षी पहिली जाहिरात, वडिलांसोबत नवी इनिंग सुरु! बर्ड फ्लूपासून बचाव कसा कराल - संसर्ग झालेल्या पक्ष्यांपासून दूर राहावं, त्यातही मृत्यूमुखी पडलेल्या पक्ष्यांपासून दूर राहावे. - बर्ड फ्लूचा संसर्ग फैलावला असेल तर मांसाहार टाळावा. - मांसाहार खरेदी करतेवेळी स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. - संसर्ग पसरलेल्या भागात जाणं टाळावं किंवा गेल्यास मास्कचा वापर करावा. बर्ड फ्लूवरील उपचार बर्ड फ्लू झाल्यास अँटिव्हायरल (Antiviral) म्हणून ओसेल्टामिवीर (टॅमीफ्लू) आणि जानामिवीर (रेलेएंजा) ही औषधं देऊन उपचार केले जातात. विषाणूंचा परिणाम कमी करण्यासाठी पुरेसा आराम करावा. लिक्वीड पदार्थांचे सेवन डाएटमध्ये अधिक प्रमाणात करावे. अन्य व्यक्तींना बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांस एकांतवासात ठेवावे.
    First published:

    Tags: Bird flu

    पुढील बातम्या