SPACE मध्ये हार्ट अटॅक आल्यास... अंतराळवीर कसा वाचवतात एकमेकांचा जीव

SPACE मध्ये हार्ट अटॅक आल्यास... अंतराळवीर कसा वाचवतात एकमेकांचा जीव

हार्ट अटॅक आल्यास पृथ्वीवर (Earth) जीव वाचवण्यासाठी दिला जाणारा प्रथमोपचार सीपीआर (CPR) अंतराळात (space) देणं शक्य नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : अंतराळ यात्रा केवळ प्रशिक्षित अंतराळवीरचं करू शकतात असा जवळपास प्रत्येकाचा समज असतो. मात्र मागील काही काळापासून अंतराळ भ्रमण हा व्यवसाय झाला असून येणाऱ्या आगामी काळात अंतराळपर्यटन देखील सुरू होऊ शकतं. यामध्ये कुणीही अंतराळात प्रवास करू शकतो. यामुळे अंतराळात प्रवासाला गेलेल्या प्रवाशांना हृदयासंबंधी आजारांनादेखील तोंड द्यावं लागू शकतं. पृथ्वीवर (Earth) जीव वाचवण्यासाठी त्या व्यक्तीला दिला जाणारा प्रथमोपचार सीपीआर टेक्निकमध्ये (CPR Technique) देखील अतंराळात बदल होणार आहे.

सीपीआर (Cardiopulmonary resuscitation)  म्हणजेच कार्डियो पल्मनरी रेसुसाइटेशन. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत या टेक्निकचा वापर करून रुग्णाचा प्राण वाचवला जातो. यामध्ये उपचार करणारी व्यक्ती  झटका आलेल्या व्यक्तीच्या छातीवर दाब देण्याबरोबरच तोंडाने श्वास देखील देते. मात्र अंतराळात असे उपचार देणं शक्य नाही.

स्पेस मेडिसीनचे तज्ज्ञ प्रोफेसर योफेन हिन्कलबेन यांनी याविषयी बोलताना सांगितलं, अद्याप कोणालाही अंतराळात हृदयविकाराचा झटका आलेला नाही. कारण आतापर्यंत केवळ फिट अंतराळवीर अवकाशात गेले आहेत आणि तेही थोड्या काळासाठी. त्यामुळे अजूनपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही.

हे वाचा - फ्लू, कॅन्सर आणि आता दोनदा कोरोना; सर्वांना पुरून उरल्या 102 वर्षांच्या आजी

पण आता अंतराळ मोहीम दीर्घकालीन होणार आहेत.  मंगळ आणि दुर्गम अवकाश मोहिमेसाठी तयारी देखील सुरू असून चंद्रावर दीर्घ कालावधीसाठी जाण्यासाठी मोहीम सुरू आहे. चंद्र आणि मंगळावर तर वसाहती तयार करण्याची देखील तयारी सुरू आहे.  त्यामुळे आता अंतराळ पर्यटन हा शब्द कल्पित शब्दकोशातून गायब होणार आहे.

त्यामुळे अंतराळात आपत्कालीन  वैद्यकीय सेवांवर  संशोधन वाढल्यास आश्चर्य वाटू नये. नुकतीच जर्मन सोसायटी ऑफ एव्हिएशन अँड स्पेस मेडिसीनचे उपाध्यक्ष प्रोफेसर योफेन हिन्कलबेन यांच्यासह स्टीफन केरकॉफ यांनी अंतराळातील सीपीआरविषयी नवीन संशोधन केलं आहे.

प्राध्यापक योफेन म्हणाले, मंगळ मोहिमेदरम्यान एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन परिस्थितीत इलेक्ट्रिकल स्ट्रोक, आघात किंवा इटोक्सिकेशनचा सामना करावा लागला तर त्या परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

हे वाचा - आधी लावला VIAGRA चा शोध, नंतर Pfizer ने बनवली कोरोना लस

एखाद्या व्यक्तीला अंतराळात हृदयविकाराचा झटका आला तर सीपीआर कसा द्यावा, याबाबत योफन यांनी सांगितलं आहे.

अंतराळात उभारण्यात येणारी ही व्यवस्था खूप वेगळी आहे. अंतराळात पाच टेक्निक वापरल्या जाऊ शकतात. यामध्ये दोन स्ट्रॅपचा वापर होतो. यामध्ये रुग्ण आणि त्याला सीपीआर देणाऱ्याला जोडून ठेवतो. त्यांना क्रू मेडिकल रेस्ट सिस्टीम म्हणतात. या व्यतिरिक्त इव्हिट्स एक रूसोमोनो टेक्निक आणि एक रिव्हर्स बियरहग टेक्निक आहे. हे तिन्ही उपचार मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगत केले जातात.

Published by: Priya Lad
First published: December 4, 2020, 11:59 AM IST

ताज्या बातम्या