मुंबई, 27 जानेवारी: मद्यसेवन आणि सेक्स या दोन्ही विषयांवर फार क्वचित चर्चा केली जाते. बऱ्याचवेळा मद्यसेवनानंतर सेक्स करण्यात अधिक उत्साह निर्माण होतो म्हणून अधिक समाधान मिळवण्यासाठी दारूच्या नशेत सेक्स केला जातो. मात्र याचा आपल्या लैंगिक जीवनावर किती आणि कसा परिणाम होतो हे मात्र फार कमी लोकांना माहिती असतं. मद्यपान केल्यानं सेक्सची अधिक इच्छा का होते आणि त्याचा लैंगिक जीवनावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
मद्यात असलेले घटक हे तुमच्या शरीरामध्ये अति ऊर्जा निर्माण करतात. मात्र त्याचा परिणाम शरीरातील रक्त प्रवाहावर होत असतो. अॅन्जिओटेन्सिन नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण वाढवतात. ज्यास्त मद्यपान करणाऱ्यांमध्ये ऑर्गेज्मचं स्खलन होण्यासाठी विलंब होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक मद्यपान करणारे पुरुष सेक्सनंतरही समाधानी नसतात असं एका अहवालातून समोर आलं आहे. हे ऑर्गेज्म स्खलन होण्यास 30 मिनिटं लागतात. त्यामुळे संभोगात काहीवेळा पार्टनरची चिडचिड होण्याची शक्यता असते. अति मद्यपान करणाऱ्यांमध्ये सेक्स करण्याची इच्छा वाढू शकते ती इथपर्यंत वाढू शकते की ज्यामुळे आपल्या पार्टनरला त्रास होईल त्यामुळे तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी ती धोक्याची घंटा असेल.
हेही वाचा-लग्नानंतर जोडीदारापासून दूर राहा… सुखी संसाराचा मंत्र लक्षात ठेवा
अशा परिस्थितीत बरेच पुरुष असुरक्षित लैंगिक संबंधात किंवा एकापेक्षा अनेक लैंगिक संबंधात गुंततात, ज्यामुळे त्यांना एड्सचा धोका असतो.
अल्कोहोलचा परिणाम केवळ मनावरच नव्हे तर शरीरावर देखील दिसून येतो. अधिक पेयांमुळे महिलांमध्ये आळस येतो. काही महिलांना मद्यापान करू सेक्स केल्यानंतर तृप्त वाटतं. मात्र अति सेक्स किंवा मद्यपानानंतर झालेल्या हार्ड सेक्समुळे महिलांना लैंगिक आजार किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे महिलांच्या गुप्तांगाचं नुकसान अधिक होऊ शकतं. सेक्सनंतर महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा पार्टनरलाही इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो.
मद्यपानानंतर केलेल्या सेक्समुळे गर्भधारणा होण्याची शक्यता उद्भवू शकते. यासोबतच एसटीडीसारखे आजारही पार्टनरला होऊ शकतो.
हेही वाचा-अॅलर्जीपासून मुक्ती हवी, मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश जरूर करा