मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमच्या घरात एअर प्युरिफायरची गरज आहे का? याला किती खर्च येतो?

तुमच्या घरात एअर प्युरिफायरची गरज आहे का? याला किती खर्च येतो?

How Air Purifier works : दिल्ली-एनसीआरसह (Delhi NCR) उत्तर भारतात प्रचंड हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्यानंतर घरांमध्ये एअर प्युरिफायरचा वापर वाढला आहे. जाणून घेऊया हे यंत्र कशा प्रकारे घरातील हवा स्वच्छ करते. यात हे उपकरण देखील अनेक प्रकारचे आहे.

How Air Purifier works : दिल्ली-एनसीआरसह (Delhi NCR) उत्तर भारतात प्रचंड हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्यानंतर घरांमध्ये एअर प्युरिफायरचा वापर वाढला आहे. जाणून घेऊया हे यंत्र कशा प्रकारे घरातील हवा स्वच्छ करते. यात हे उपकरण देखील अनेक प्रकारचे आहे.

How Air Purifier works : दिल्ली-एनसीआरसह (Delhi NCR) उत्तर भारतात प्रचंड हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्यानंतर घरांमध्ये एअर प्युरिफायरचा वापर वाढला आहे. जाणून घेऊया हे यंत्र कशा प्रकारे घरातील हवा स्वच्छ करते. यात हे उपकरण देखील अनेक प्रकारचे आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : दिल्ली-एनसीआरसह (Delhi NCR) उत्तर भारतात हवा प्रदूषणाने (Air Pollution) गंभीर रुप धारण केलं आहे. यावर न्यायालयात सुनावणी देखील सुरू आहे. लोकांना श्वास घेणं मुश्किल होत आहे. यावर पर्याय म्हणून लोकं आता एअर प्युरिफायरचा (Air Purifier) वापर करत आहेत. पण, एअर प्युरिफायर खरच फायदेशीर आहे का? कोणता एअर प्युरिफायर सर्वात चांगला आहे? आपल्या घरात एअर प्युरिफायरची गरज आहे का? सर्वात महत्वाचं म्हणजे याला खर्च किती येतो? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील ना? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.

एअर प्युरिफायर हा पाणी फिल्टर (Water Filter) सारखाच हवा स्वच्छ करण्यासाठी फिल्टरचा संच आहे. हा फिल्टर देखील जाम होतो. साधारणपणे एअर प्युरिफायर महिनाभर चालवल्यानंतर त्यात घाण साचलेली दिसते. ही तीच घाण असेल जी श्वासासोबत आपल्या फुफ्फुसात जाते. खोली किती मोठी आहे, याच्या आधारावर प्युरिफायर हवा स्वच्छ करतो. ज्याला 15 ते 30 मिनिटे लागतात.

प्युरिफायरमधील सर्व काही मशीनच्या फिल्टरवर अवलंबून असते. हे हवेतील कण आणि परागकण काढून टाकते, ज्यामुळे हवा स्वच्छ होते. सर्व प्युरिफायर फिल्टरसह येतात.

प्युरिफायरमध्ये चार प्रकारचे फिल्टर असतात

  1. हेपा फिल्टर (HEPA filter)
  2. कार्बन फिल्टर
  3. आयनिक जनरेटर (ionic generate)
  4. अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन (UV)

Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम; इतकं आयुष्य घटण्याची भीती

दुर्गंध नष्ट करते

सक्रिय कार्बन फिल्टर आणि HEPA-फिल्टर आंतरराष्ट्रीय मानके आहेत. ते कण तसेच गंध दूर करतात. प्री-फिल्टर असलेले प्युरिफायर HEPA-फिल्टरचे आयुष्य वाढवते. हवेमध्ये PM 2.5 आणि PM 10 सोबत भरपूर धूळ, ऍलर्जीक घटक असतात.

HEPA हा एक प्रकारचा मेकॅनिकल एअर फिल्टर आहे. जे दूषित घटकांना स्वतःकडे आकर्षित करते. योग्य HEPA फिल्टर 99.97 टक्के धूळ कॅप्चर करतो. धुळीचा एक कण 0.3 microns मध्ये मोजला जातो. हे फिल्टर धूळ तसेच खराब बॅक्टेरिया आणि व्हायरस कॅप्चर करते. या फिल्टरपासून बनवलेल्या प्युरिफायरमध्ये दोन मूलभूत घटक असतात, एक HEPA फिल्टर आणि एक पंखा.

आयओनिक फिल्टर एअर क्लीनिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ते हवेतील दूषित घटकांच्या विद्युतीय पृष्ठभागावरून कार्य करतात. त्याची प्रक्रिया 0.01 मायक्रॉन आकाराचे कण देखील काढून टाकते.

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

सक्रिय कार्बन फिल्टरला (Activated Carbon Filter) चारकोल एअर फिल्टर देखील म्हणतात. अशा सक्रिय कार्बनचा वापर या फिल्टरमध्ये केला जातो जो शेकडो दूषित पदार्थ शोषून घेतो. यात रसायने, हानिकारक वायू, गंध, VOC यांचा समावेश आहे. हे फिल्टर लवकर बदलावे लागतात.

UV LIGHT एअर फिल्टरमध्ये एक तंत्रज्ञान आहे, जे डोळ्यांना न दिसणारा प्रकाश बाहेर सोडते. याला अल्ट्रा लाईट म्हणतात. हा प्रकाश जंतू आणि विषाणूंवर हल्ला करतो.

एअर प्युरिफायरची किंमत cost of Air purifier

प्युरिफायरची किंमत शहराच्या प्रदूषणावर अवलंबून असते. जेव्हा प्रदूषण जास्त असते तेव्हा फिल्टर वारंवार बदलावे लागते. अन्यथा मशिन बिघडते. अनेक प्रदूषकांचे परिणाम दूर करण्यासाठी प्युरिफायर ओझोन वायू देखील सोडतात. हा वायू फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो पण धुळीत मिक्स झाल्यानंतर असे स्पष्टीकरण प्युरिफायर बनवणाऱ्या कंपन्यांनी दिलं आहे. कॅमफिल प्युरिफायर हे सर्वात महाग प्युरिफायर मानले जाते, ते मॉलि‍क्यूलर फिल्टरेशन करते. तुम्ही ऑनलाईन साईट्सवर जाऊन याच्या किमती तपासू शकता.

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे घशात जळजळ, डोकेदुखीच्या समस्या वाढल्या; हे उपाय ठरतील गुणकारी

प्युरिफायरचे काय फायदे आहेत

तुम्ही 12 तास घरातच राहत असल्यास 50 टक्के प्रदूषित हवेत श्वास घेत नाही, असे म्हणता येईल. एअर प्युरिफायर हवेतील बॅक्टेरिया, प्राण्यांचे केस, धूर, विषाणू बाहेर काढून हवा स्वच्छ ठेवतात. बाहेर पडताना चांगल्या दर्जाचा मास्क घाला. कारण अर्धा वेळ तुम्ही स्वच्छ हवेत असता तर अर्धा वेळ प्रदूषित हवेत श्वास घेता. त्याचा काही उपयोग होणार नाही. प्युरिफायर अस्थमा, ब्रॉन्कायटिस, एम्फिसीमा, श्वसन ऍलर्जी, प्रदूषणामुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी करते.

First published:

Tags: Air pollution, Delhi, Pollution