Home /News /lifestyle /

Travel Tips : हॉटेलमध्ये सुरक्षित मुक्कामासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

Travel Tips : हॉटेलमध्ये सुरक्षित मुक्कामासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने हॉटेलमध्ये रुम बुक करता येते. परंतु ऑनलाइन बुकिंगमध्ये हॉटेलच्या सुरक्षिततेचा आढावा घेणे अशक्य असते, तर ऑफलाइन बुकिंग केल्यानंतरही सुरक्षिततेची कोणतीही हमी नसते.

  मुंबई 05 जुलै : अनेकदा कुठेतरी फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपल्यावर हॉटेलमध्ये थांबण्याची वेळ येते. अशावेळी अनेकांच्या मनात हॉटेलच्या सुरक्षेबाबत (Hotel Security) लोकांच्या शंका येतात. अशा परिस्थिती काही सुरक्षितता टिप्स (Safety In Hotel) लक्षात ठेवल्या तर तुम्ही हॉटेलमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय आरामात राहू शकता. हॉटेलमध्ये रूम बुक करण्याचे (Hotel Booking) ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्ग आहेत. ऑनलाइन बुकिंगमध्ये (Online Hotel Booking) हॉटेलच्या सुरक्षिततेचा आढावा घेणे अशक्य असते. तर ऑफलाइन बुकिंग (Offline Hotel Booking) केले तरी हॉटेलमध्ये तुमच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी (Safety Guarantee) नसते. अशा स्थितीत तुम्ही काही स्मार्ट टिप्सच्या (Safety tips) मदतीने स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करू शकता. हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या या स्मार्ट टिप्स माहिती शेअर करणे टाळा हॉटेलमध्‍ये मुक्‍कामादरम्यान तुमच्‍या हॉटेलचे तपशील कोणत्‍याही अनोळखी व्‍यक्‍तीसोबत शेअर करू नका. तसेच रिसेप्शनवर चावी घेताना तुमचा रूम नंबर कोणालाही कळू देऊ नका. तुमच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या कोणत्याही अनोळखी किंवा संशयित व्यक्तीला तुमचा रूम नंबर कळला तर लगेच तुमची खोली बदला आणि सतर्क व्हा.

  Vastu Tips: सुखाचा होईल संसार; वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने फक्त या गोष्टींची वेळीच काळजी घ्या

  स्वच्छता पाळा हॉटेलच्या खोलीत ठेवलेल्या वस्तू कमीत कमी वापरणे कधीही चांगले. अनेक हॉटेल्समध्ये दररोज खोलीची साफसफाई होत नाही. त्यामुळे खोलीत ठेवलेल्या भांड्यात पाणी प्यायल्याने तुम्ही आजारी पडू शकता. म्हणूनच तुम्ही हॉटेलमध्ये पिण्यासाठी मिनरल वॉटर ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर हॉटेलच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यापूर्वी तो स्वच्छ धुवून घ्या. सावधगिरी बाळगा हॉटेलमधील काही ठिकाणे थोडी धोकादायकही असू शकतात. त्यामुळे हॉटेलच्या छतापासून आणि बाल्कनीपासून योग्य अंतर राहा. तसेच सुरक्षिततेसाठी आपल्या खोलीतला व्ह्यू बाहेरून दिसू नये याची काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटाच्या अनेक विकारांवर जालीम आहे आल्याचा मुरंब्बा! जाणून घ्या सर्व फायदे रिव्ह्यू तपासा तुम्ही हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग करत असाल तर हॉटेलचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासल्यानंतरच रूम बुक करा. तसेच ऑफलाइन बुकिंग करण्यापूर्वी फोनवर हॉटेलचे रिव्ह्यू तपासण्यास विसरू नका आणि सर्वोत्तम सुरक्षा रिव्ह्यू असलेल्या हॉटेलमध्येच खोली बुक करा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Travelling

  पुढील बातम्या