Home /News /lifestyle /

एक खेकडा; कोरोना लशीत निभावणार महत्त्वाची भूमिका

एक खेकडा; कोरोना लशीत निभावणार महत्त्वाची भूमिका

Horseshoe Crab हा जीव कोरोनाव्हायरसविरोधातील लढाईत एक मोठं शस्त्र ठरणार आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लशीसाठी (corona vaccine) प्रयत्न सुरू असताना आता हॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) हा खेकडा लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची चिन्हं आहेत. या खेकड्याची रोगप्रतिकारक शक्ती पाहून शास्त्रज्ञही हैराण झालेत. त्याचं विशिष्ट निळ्या रंगाचं रक्त कोव्हिड-19 विरोधातील लढाईत आता उपयोगात येण्याची शक्यता आहे. हॉर्सशू क्रॅब हा मानव आणि डायनोसरच्या आधीही 40 कोटी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. या प्रजातीच्या खेकड्याचं निळ्या रंगाचं रक्त मेडिकल सायन्समध्ये अमृत मानलं जातं. ज्याची किंमतही 11 लाख रुपये लीटर आहे. या रक्तापासून काही सेकंदातच सुरक्षित अशा पेशींची निर्मिती होते. त्यामुळे त्याची रोग प्रतिकारकशक्ती खूप असते आणि तो इतर जीवांपेक्षा अधिक काळ जिवंत राहतो. 1970 मध्‍येच या खेकड्याचं रक्त लिम्युलस एमेबोसाईट लिजेट (LAL)  या टेस्टसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. ताप तसंच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बॅक्टेरियांना ओळखण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची मानली जाते. अमेरिकेतील एका औषध कंपनीचे प्रमुख जॉन डबजॅक यांच्या हवाल्याने 'यूएसए टुडे'च्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, औषध कंपन्या ज्या औषधांसह लशी, मेडिकल उपकरणं बनवतात त्यांची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी या टेस्टचं महत्त्व अधिक आहे. विशेष बाब म्हणजे या टेस्टचं नाव हॉर्सशू क्रॅबच्या लिम्युलस पॉलीफेमस या शास्त्रीय नावावरच ठेवण्‍यात आलं आहे. हे वाचा - फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही देणार कोरोना लस; पुण्याच्या 'सीरम'कडून उत्पादन जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. तब्बल 3 कोटींपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर 9 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरात कोरोना लस बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. सर्वात आधी कोणतीही लस आली तरी LAL ही टेस्टटच लशीसाठी स्टँडर्ड टेस्ट ठरेल. असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. LAL टेस्टसाठी अमेरिकेत मेरिलँड, व्हर्जिनिया, कॅरोलिना, मॅसेचुसेट्स या चार ठिकाणी प्रोडक्शन केंद्र आहे. लशीच्या सुरक्षा तपासणीसाठी जे काही साहित्य लागेल ते तीन दिवसांतच प्रोडक्शनमधून मिळेल. त्यामुळे कोरोना लशीच्या 5 अब्ज डोसच्या तपासणीसाठीही अडचण राहणार नाही, असं हॉर्सशू क्रॅब या प्रकल्पाचे प्रमुख बर्जेसन यांनी सांगितलं. हे वाचा - सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक दक्षिण कोरियातील संशोधक डॅनिअल सॅसन यांच्या मते, हॉर्सशू क्रॅब हा प्रत्यक्षात खेकडा नसून तो कोळ्याच्या प्रजातीच्या जवळील आहे. मात्र तो खेकड्यासारखा दिसतो हेदेखील नाकारता येत नाही. हा जीव विचित्र दिसत असला तरी तो विषारी आणि आक्रमक नाही. 10 पाऊंड वजनाचा हा जीव माणसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचं शरीरावरील कवच इतकं मजबूत असतं की त्यावर ज्वालामुखीचाही परिणाम होत नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या