घोडेस्वारी गेली उडत; गारठलेल्या घोड्यानं पांघरूण ओढून मारला Chill; पाहा VIDEO

घोडेस्वारी गेली उडत; गारठलेल्या घोड्यानं पांघरूण ओढून मारला Chill; पाहा VIDEO

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत माणसांप्रमाणे या घोड्यालाही (horse) अंथरूणातून बाहेर पडू नये असंच वाटतं आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जानेवारी : थंडीत (winter) कुणालाही सकाळी अंथरूणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. शरीरात आळस तर असतोच पण इतकी हुडहुडी भरते की पांघरूण बाजूला सारावंसंही वाटत नाही की पांघरूणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. अशी अवस्था फक्त माणसांचीच नाही तर प्राण्यांचीही आहे. नेहमी अॅक्टिव्ह असणारा घोडाही (horse) याला अपवाद ठरला नाही. घोड्यानं चक्क पांघरूण ओढून मालकासोबतच आराम केला आहे.

सोशल मीडियावर एका घोड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गादी, पांघरूण आणि उशी घेऊन घोडा मस्त झोपताना दिसतो आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत पाहू शकता एका रूममध्ये एक घोडा आणि एक मुलगी आहे. घोडा सुरुवातीला एका गादीवर बसला आहे. हळूहळू तो गादीवर झोपतो. तिथं असलेली मुलगीही त्या गादीवर जाते आणि त्या घोड्याला पांघरूण घालते. घोडा उशीवर आपलं डोकं टेकवतो. मुलगी त्याच्या अंगावर पांघरूण घालत असते. तेव्हा घोडाही आपल्या अंगावर पांघरूण ओढून घेतो आणि शांत झोपी जातो. ती मुलगीही त्याच्यासोबत झोपतो.

हे वाचा - दुबईच्या प्रिन्सची शहामृगासोबत शर्यत; VIDEO पाहून तुम्हीच सांगा विजेता कोण?

"आज तुझा भाऊ पांघरूणात chill मारणार, आज घोडेस्वारी नाही", असं कॅप्शन दिपांशू यांनी या व्हिडीओला दिलं आहे. तसंच "घोडा इतका पाळीव असू शकतो, यावर विश्वासच बसत नाही. असेच संबंध विकसित करण्याची गरज आपणा सर्वांना आहे", असं ट्वीटही दिपांशू यांनी केलं आहे.

Published by: Priya Lad
First published: January 4, 2021, 9:50 PM IST

ताज्या बातम्या