राशीभविष्य : कन्या आणि मीन राशीच्या लोकांना मिळू शकतो आर्थिक नफा

वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींसमोर कोणती आव्हानं असतील? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींसमोर कोणती आव्हानं असतील? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

  • Share this:
    मुंबई, 05 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- निरोगी राहण्यासाठी अति खाणं टाळा. गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. वृषभ- आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवून आनंद घेऊ शकाल. मिथुन- आज आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. नव्या कल्पना फायद्याच्या ठरतील. कर्क- प्रिय व्यक्तीसोबत मौल्यवान वेळ घालवा. शेवटच्या क्षणी आपल्या योजना बदलू शकतात. सिंह- वेळीच खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रेमासोबत केलेला प्रवसा खूप सुंदर असेल. आजचा दिवस कंटाळवाणा वाटेल. कन्या- अचानक नफा मिऴण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबीयांसोबत छान वेळ जाईल. प्रयत्न केल्यास आजचा दिवस थोडा चांगला जाईल. हे वाचा-टीम इंडियासाठी वाईट बातमी; हा स्टार खेळाडू T-20 सीरिजमधून बाहेर तुळ- आज आपल्यावर लोक रागवतील. आज आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. आज कुटुंबीयांसोबत वेळ घालवा. वृश्चिक- आज आपण समोरच्याच्या भावना दुखावू शकता. प्रिय व्यक्तीला भेटू शकता. धनु- आरोग्याची काळजी घ्या. आज आपलं थोडं कौतुक होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. मकर - आज आपल्या समजूदारपणाचा कस लागेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आज गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकतं. कुंभ- आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. आपल्याकडून एक मोठी चूक होऊ शकते. मीन- आजचा दिवस आर्थिक फायदा मिळवून देणार असेल. याशिवाय संमिश्र स्वरुपाचा जाईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: