कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांची होऊ शकते दिशाभूल, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांची होऊ शकते दिशाभूल, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

12 राशींसाठी कसा असेल 17 फेब्रुवारीचा दिवस वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी: रोजचा दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे आपल्याला कधीकधी दिवस चांगला जातो तर काहीवेळा आव्हानांचा सामना करावा लागतो. अशावेळी आव्हानं कोणती आहेत याची पूर्वकल्पना मिळाली तर आपल्याला येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणं अधिक सोपं होतं यासाठी जाणून घ्या कसा असेल 12 राशींसाठी 17 फेब्रुवारीचा दिवस.

मेष - अलीकडे घडलेल्या घटनांमुळे आपल्याला उदासीनता येईल. कौटुंबिक सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या मनात आपल्याविषयी झालेला संशय वेळीच दूर न केल्यास तणाव वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ - आशावादी होण्यासाठी प्रवृत्त करा. खर्च वाढतील, पण आपल्या उत्पन्नात समतोल राखला जाईल. महत्त्वाच्या योजना पुढे ढकलल्या जाऊ शकतात. कायद्याच्या गोष्टींमध्ये आज आपल्याला यश मिळेल.

मिथुन - आरोग्याची काळजी करू नका. बिनधास्त राहायला शिका. खर्चावर नियंत्रण ठेवा. देवाणघेवाणीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आपली वैयक्तिक माहिती कुठेही देण्याआधी विचार करा. त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

कर्क - आर्थिक स्थिती सुधारेल. कामाचा ताण वाढेल. आज आपली कामात आणि त्या व्यतिरिक्त कामांतही दिशाभूल करणारे अनेक लोक भेटतील. अशांपासून वेळीच सावध राहा. पार्टनरसोबत वाद होतील.

सिंह - क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यावर आज भर देऊ नका. त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल. जोडीदाराची साथ मिळेल. मित्रांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल.

कन्या - आवडत्या गोष्टी करा. आर्थिक अडचणींमुळे वादविवाद होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवाल. व्यवसाय अथवा गुंतवणुकीत आपली फसवणूक होऊ शकते. कोणतेही व्यवहार किंवा योजना तयार करताना अलर्ट राहा.

तुळ - गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्या. रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवाल. प्रेमात पडण्याचा दिवस. सहकार्यांचे सहकार्य मिळणार नाही. पण धीर सोडू नका आपण आपल्या स्वत:च्या प्रयत्नांवर कार्य पुढे नेत राहा.

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी अधिक प्रयत्न करण्याची गरज. अफवांवर विश्वास ठेवू नका. आज एकटेपणा जाणवण्याची शक्यता आहे. प्राण्यांसोबत वेळ घालवला तर आनंद मिळेल.

धनु - खर्च वाढवू नका. आपल्या आवडीवर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रकरणं अधिक गुंतागुंतीचे होईल. आज गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील. बोलताना परिस्थितीचं भान ठेवून बोला. आपली एक चूक अनेक समस्या निर्माण करू शकते.

मकर - विनाकारण इतरांना सल्ला देत फिरू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा, शांत राहा. रिअल इस्टेटमध्ये अधिक पैसे गुंतवले जाऊ शकतात. जोडीदारासोबत मनमोकळेपणानं संवाद साधा.

कुंभ - कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. नव्या योजना आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या असतील. त्यासाठी भविष्यातील योजना आताच तयार करा. कुठल्याही गोष्टींवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका.

मीन - बँक संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. समस्या आपल्यासाठी खूप मोठी असू शकते. अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे ताण येऊ शकतो. छंद जोपासल्यानं आपला ताण कमी होण्यास मदत होईल.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा-Coronavirus नंतर आता या व्हायरसचा धोका, ब्राझीलमध्ये सापडला नवा व्हायरस

हेही वाचा-मुलगी नोकरी करणारीच हवी; लग्न करताना मुलाची का असते अशी अट?

First published: February 17, 2020, 7:18 AM IST

ताज्या बातम्या