राशीभविष्य : कर्क आणि धनु राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची घ्यायला हवी विशेष काळजी

राशीभविष्य : कर्क आणि धनु राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची घ्यायला हवी विशेष काळजी

12 राशींसाठी कसा असेल 23 मेचा दिवस, जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 23 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस.

मेष- आर्थिक स्थिती चांगली होईल. वाईट सवयी सोडण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. घाईगडबडीनं निर्णय घेऊ नका.

वृषभ- चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी नियोजन करा. आज तुम्हीला प्रेमापासून कोणीही दूर करू शकणार नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन - प्रत्येक गोष्टीत तक्रार करणे टाळा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा. पुस्तकात वेळ घालवणं आपल्यासाठी फायदेशीर आहे.

कर्क- आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांची मतं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.

सिंह - गर्भवती महिलांनी आज विशेष काळजी घ्या. आपल्या आत्मविश्वासानं बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील. पार्टनरच्या पुन्हा नव्यानं प्रेमात पडाल. कुटुंबीयांसोबत चांगली संध्याकाळ घालवा.

हे वाचा-विठुरायाच्या गाभाऱ्याला द्राक्षांचा आरास...पाहा मन प्रसन्न करणारे 5 PHOTO

कन्या- वजनाकडे लक्ष द्या. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नवीन प्रकल्पांवर काम करण्याआधी विचार करा.

तुळ - प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टींना बाजूला सारा. जोडीदारावर दबाव टाकणं टाळा. कुटुंबीयांसोबत वेळ घालवा.

वृश्चिक - स्वत:साठी जो पुरेसा वेळ मिळाला आहे त्याचा योग्य वापर करा. प्रयत्न करत राहा त्याचं फळ आपणच मिळेल.

धनु - आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. विशेषतः मायग्रेनच्या रूग्णांनी वेळेवर खाणे थांबवू नये, अन्यथा त्यांना व्यर्थ भावनिक तणावातून जावे लागू शकते.

मकर - गुंतवणूकीमुळे तुमची भरभराट होईल आणि आर्थिक सुरक्षा वाढेल.आज, विश्रांतीसाठी फारच कमी वेळ आहे कारण आधीची अडकलेली काम मार्गी लावायची आहेत.

कुंभ - आरोग्य चांगलं राहिल. एकाकीपणावर विजय मिळविण्यासाठी पुस्तके हा एक उत्तम मार्ग आहे. पुस्तकासह वेळ घालवून आपण आजच्या चांगल्या गोष्टीत वेळ घालवू शकता.

मीन- प्रगतीच्या दिशेने उत्कृष्ट पावले उचलाल. वादविवादानं त्रास होईल.

हे वाचा-दोन वेळच्या खाण्याचे वांदे असतानाही हरला नाही हिम्मत, खेचून आणलं त्यानं यश

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 08:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading