राशीभविष्य : मेष आणि मकर राशीच्या व्यक्तींना मानसिक त्रासाला करावा लागेल सामना

राशीभविष्य : मेष आणि मकर राशीच्या व्यक्तींना मानसिक त्रासाला करावा लागेल सामना

जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

  • Share this:

मुंबई, 13 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील आव्हानं कोणती याची कल्पना आधीच आपल्याला असेल तर त्यावर तोडगा काढणं किंवा ती येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील राहाणं सोपं होतं यासाठीच जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

मेष - आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. कामावरच्या ठिकाणी दबाव वाढल्यानं त्रास होईल. दिवसाच्या सुरुवातीला योजना केल्या तर दिवस चांगला जाईल.

वृषभ- आजचा दिवस फायदेशीर आहे. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. पुरेशी विश्रांती घ्या. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा.

मिथुन- घाईत निर्णय घेऊ नका. आपल्याला बरेच पैसे येतील पण खर्च होणार आहेत. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. वेळ वाया घालवू नका.

कर्क- केलेल्या नियोजनात बदल करावा लागेल. नवीन आर्थिक करार करत असाल तर अंतिम टप्प्यात येतील. वैवाहिक जीवनात अनेक समस्या जाणवतील.

सिंह - आर्थिक संकटातून मुक्त व्हाल. नवीन योजना, करार फायदेशीर वाटू शकतात. गुंतवणूक करताना घाईनं निर्णय घेऊ नका. प्रिय व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या.

कन्या- आज आपल्याला आर्थिक फायदा होईल. जोडीदारावरील प्रेमाची जाणीव आज आपल्याला होईल. कामाच्या ठिकाणी होणारा त्रास कमी होईल. संवाद साधताना शब्दांचा जपून वापर करा.

हे वाचा-'तेरे बिना'मध्ये सलमानची ऑनस्क्रीन मुलगी साकारणारी 'ती' बालकार आहे तरी कोण?

तुळ- आपलं म्हणणं इतरांवर लादू नका. आज आपल्याला टीकेचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल.

वृश्चिक- गर्भवती महिलांनी आज विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आज आपल्याला राग आला तरी त्यावर आवार घालणं गरजेचं आहे. आपली गोपनीय माहिती उघड करू नका. जास्त काम करणं टाळा त्यामुळे ताण येईल.

धनु- परिस्थितीशी लढा. टीकेचा सामना करावा लागेल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

मकर- शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी ध्यान आणि योग करा. उत्पान्नात वाढ झाली तरीही खर्चातही वाढ होईल. कामाच्या ठिकाणी मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.

कुंभ- प्रेमासाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यावसायात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल.

मीन- आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. प्रिय व्यक्तींना दुखवू नका. जोडीदाराकडून आज सरप्राइज मिळेल.

हे वाचा-Lockdwon: 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर.

First published: May 13, 2020, 9:05 AM IST

ताज्या बातम्या