राशीभविष्य : कन्या आणि मीन राशीच्या व्यक्तींनी ठेवायला हवं रागावर नियंत्रण

राशीभविष्य : कन्या आणि मीन राशीच्या व्यक्तींनी ठेवायला हवं रागावर नियंत्रण

कसा असेल 29मे चा आपला दिवस, कोणत्या राशीच्या व्यक्तींना संकटाचा सामना करावा लागेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 29 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे येणाऱ्या समस्या आणि संभाव्य धोके माहीत असतील तर त्याचं निराकरण करणं अधिक सोपं जात त्यासाठी जाणून घ्या कसा असेल 29 मेचा दिवस.

मेष - वाद घातल्यानं आज आपली मनस्थिती बिघडू शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये अडकू नका. जोडीदाराच्या शंकांचं निरसन करा.

वृषभ- जोडीदार तुम्हाला आनंदी करण्यासाठी बरेच प्रयत्न करेल. छंद जोपासल्यामुळे आपल्याला त्यातून आनंद मिळेल.

मिथुन- गुंतवणूक कऱण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. आपल्या अपेक्षांची पूर्तता होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल.

कर्क- दीर्घ काळापासून थकवा जाणवत आहे. आज आपल्याला कामातून थोडा आराम मिळेल. घरगुती बाबींकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह - प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढवा.

कन्या- भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक फायदा होईल. प्रेमात तिसरा सगळं विसरा अशी आपली स्थिती होऊ शकते.

हे वाचा-व्हायचं होतं स्पायडर मॅन; विषारी कोळीकडून चावून घेतलं आणि वाचा झालं काय

तुळ- कोणताही विचार न करता निर्णय घेणं भविष्यात धोकादायक ठरू शकतं. आयत्यावेळी नियोजनात बदल करावा लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- समस्या कुटुंबीयांसमोर मांडा. प्रिय व्यक्तीसोबत अचानक झालेली भेट किंवा संवाद आनंद देणारा असेल. वैवाहिक जीवनात तणावाचं वातावरण असेल.

धनु- शंकाखोर वृत्तीमुळे बऱ्याच ठिकाणी पराभव पत्करावा लागेल. गुंतवणूकीमुळे तुमची भरभराट होईल आणि आर्थिक सुरक्षा वाढेल.

मकर- पल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि भीती दूर करण्याची आवश्यकता आहे.

कुंभ- भीती आणि आपल्या चिडचिडा स्वभाव प्रिय व्यक्तीसाठी आणि कामाच्या ठिकाणी त्रासदायक ठरेल.

मीन- आपल्या कुटुंबाच्या भावना समजून घ्या आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

हे वाचा-निवृत्तीला अवघे 3 दिवस असताना कोरोना योद्ध्याने घेतला जगाचा निरोप

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 29, 2020, 7:06 AM IST

ताज्या बातम्या